team india  saam tv
Sports

WTC FINAL: WTC च्या फायनलसाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग 11, Ajinkya Rahane ला संधी तर दिग्गज ऑलराऊंडरला केलं बाहेर

Sunil Gavaskar Playing 11 For WTC Final: दिग्गज खेळाडूंनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ ची निवड केली आहे.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात दिग्गज भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. जानेवारी २०२२ मध्ये त्याला खराब फॉर्ममुळे संघातील स्थान गमवावे लागले होते.

आता आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करत त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. दरम्यान आता सुनील गावस्कर यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ ची निवड केली आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात म्हटले की, 'भारतीय संघात केवळ एकच बदल करण्याची गरज होती, तो बदल म्हणजे श्रेयस अय्यरच्या जागी कोणीतरी अनुभवी फलंदाज हवा.

रहाणेची निवड आयपीएल स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे नव्हे तर रणजी स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे झाली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी अप्रतिम खेळी केली. आता प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे'

सुनील गावसकर यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली आहे. त्यांनी या सामान्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे.

त्यानंतर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला संधी दिली आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी केएस भरत ऐवजी केएल राहुलची निवड केली आहे.

त्यांनी या संघातून अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवलं आहे. तर रवींद्र जडेजा, आर अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले आहे. (Latest sports updates)

अशी आहे सुनील गावसकर यांनी निवडलेली प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

WTC च्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT