pankaj advani twitter
Sports

Pankaj Advani: पंकज अडवाणी पुन्हा चमकला! जागतिक बिलियड्‌र्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर कोरलं नाव

Pankaj Advani News: पंकजने सौरवला पराभूत करत जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील २६ वे जेतेपद ठरले आहे.

Ankush Dhavre

Pankaj Advani:

भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने मंगळवारी (२१ नोव्हेंबर) झालेल्या स्पर्धेत भारताच्या सौरव कोठारीला पराभूत केलं आहे. पंकजने सौरवला पराभूत करत जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील २६ वे जेतेपद ठरले आहे.

पंकज अडवाणीने आतापर्यंत ९ वेळेस विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे. २००५ मध्ये त्याने पहिल्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. गुणांच्या प्रकारात त्याने ८ विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे. यासह त्याने एक वेळेस जागतिक सांघिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. (Latest sports updates)

पंकज अडवाणीने उपांत्य फेरीच्या लढतीत रुपेश शाहला ९००-२७३ इतक्या गुणांनी धूळ चारली होती. तर दुसरीकडे सौरवने उपांत्य फेरीत ध्रुव सितवालावर ९००-७५३ गुणांच्या फरकाने विजय मिळवला होता. तसेच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंकज अडवाणीने सौरव कोठारीवर १०००-४१६ गुणांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT