World Test Championship 2023-2025 Points Table: भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पाचव्या दिवसाचा जवळपास ५ तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला.
अखेरीस BCCI ने हा कसोटी सामना ड्रॉ करण्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला मालिकेत १-० अशा विजयावर समाधान मानावे लागले. दरम्यान, दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले असून पाकिस्ताचा फायदा झाला आहे.
पहिल्या डावा मोठी धावसंख्या उभारून टीम इंडियाने वेस्ट इंडिजला झटपट माघारी धाडत दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली होती. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजच्या संघाने ३२ षटकांत २ बाद ७६ धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी २८९ धावांची गरज होती. हा सामना टीम इंडिया सहज जिंकेल असं वाटत होता. पण पावसाने सामन्यात ख्वाडा घातला.
त्यामुळे दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. दरम्यान, भारताने दोन सामन्याची कसोटी मालिका १-० अशी खिशात घातली. मात्र, मालिका जिंकून सुद्धा टीम इंडियाला मोठा फटका बसला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाकिस्तानचा मोठा फायदा झाला. दोन्ही संघांना समान गुण वाटप झाल्याने WTC मधील भारताची विजयाची टक्केवारी घसरली. त्यामुळे पाकिस्तान हा WTC पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
पाकिस्तान १०० टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहाचला, तर भारताला ६६.६७ टक्क्यांमुळे दुसऱ्या स्थानी घसरण झाली. ऑस्ट्रेलिया ( ५४.१७) व इंग्लंड ( २९.१७) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. विंडीजने १६.६७ टक्क्यांसह पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.