star indian pacer mohammed shami gets bail in wife hasin jahan harassment case world cup 2023  saam tv
Sports

Mohammed Shami: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू न्यायालयात! काय लागला निकाल?

Mohammed Shami Gets Bail: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघातील स्टार खेळाडूला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Gets Bail:

आगामी वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत २ हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे.

त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता न्यायालयाने त्याला दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. आता या हिंसाचाराच्या प्रकरणात मोहम्मद शमीचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शमीसह त्याचा भाऊ मोहम्मद हासिमला देखील न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. हे दोघे भाऊ मंगळवारी(१९ सप्टेंबर) न्यायालयात हजर झाले होते.

जामीन मिळाल्यानंतर वकील सलीम रहमान यांनी म्हटले की, शमी आणि त्याचा भाऊ हासिम न्यायालयात हजर होते.

न्यायालयाकडून त्यांची याचिका मंजूर करण्यात आली आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने ८ मार्च २०१८ रोजी मोहम्मद शमी आणि त्याच्या भावावर कोटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाविरूद्ध २ हात करण्यासाठी उतरणार मैदानात..

मोहम्मद शमीला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला केवळ २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.

वनडे वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या मालिकेत त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Maharashtra News Live Update: जळगाव कुंभारीला उभारणार पोलिस प्रशिक्षण केंद्र - मंत्री उइके यांची घोषणा

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT