Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Saam Tv

कढई स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स

स्वयंपाकघरातील ॲल्युमिनियमची जुनी भांडी काळी पडली असल्यास या ट्रिक्स वापरुन चमकवा काही मिनिटांत

Aluminium kadhai Cleaning | pinterest

सोपे उपाय

स्वयंपाकघरात ठेवलेली स्टीलची भांडी धुतल्यानंतर सहज चमकतात, पण ॲल्युमिनियमची भांडी वेळेसोबत काळी पडू लागतात.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

व्हिनेगरचा वापर

कढईत पाणी व अर्धा कप व्हिनेगर घालून १५-२० मिनिटे उकळा आणि स्क्रबरने घासून स्वच्छ करा. यामध्ये असणारे ॲसिडिक गुणधर्म चिकटपणा सहज दूर करतात.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

लिंबू आणि बेकिंग सोडा

कढईवर १ चमचा बेकिंग सोडा आणि १ लिंबाचा रस टाका. ५ मिनिटे तसेच ठेवून नंतर स्क्रबरने स्वच्छ धुवून घ्या. लिंबू आणि बेकिंग सोडायचे मिश्रण काळ्या पडलेल्या ॲल्युमिनियमच्या कढईला काही मिनिटांत छान चमकवू शकते.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

डिटर्जंट आणि पाणी

कढई स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट आणि पाणी उकळणे हा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कढईत पाणी आणि २ चमचे डिटर्जंट मिसळून १० मिनिटे उकळा. पाणी थोडे थंड झाल्यावर कढई घासून घ्या.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

फाईन सँडपेपर

जर कढईच्या मागच्या बाजूला खूप जास्त काजळी किंवा जाड घाण साचली असेल, तर ती काढण्यासाठी सँडपेपर उपयुक्त ठरतो. सँडपेपर घेऊन कढईच्या मागील भागावर हलक्या हाताने घासा. त्यानंतर डिशवॉश लिक्विडने धुवून टाका.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

कोणती काळजी घ्यावी?

कढईवरील घट्ट काजळी खरवडण्यासाठी अनेकदा लोक चाकू किंवा इतर टोकदार वस्तूंचा वापर करतात. भांड्याचा पृष्ठभाग खराब होऊ नये म्हणून कढई साफ करण्यासाठी कधीही टोकदार वस्तू वापरू नका.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

निष्कर्ष

या सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुमची जुनी, काळी पडलेली कढई दिसेल अगदी नवीनसारखी चकाचक करु शकतात.

Aluminium kadhai Cleaning | pinterest

NEXT : डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Fruit Juice For Diabetes
येथे क्लिक करा