भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. या पराभवासह भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहवर आयसीसीचा नियम मोडण्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसीसीने आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. तर झाले असे की, भारतीय संघाकडून ८१ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. ज्यावेळी बुमराह गोलंदाजी करत होता त्यावेळी पोप फलंदाजी करत होता.
तो फलंदाजी करत असताना जसप्रीत बुमराह त्याच्या वाटेत आला. दोघांमध्ये धडक झाल्याचे पाहायला मिळाले. आयसीसीने जसप्रीत बुमराहला आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.१२ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या कलमनुसार,जर एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूसोबत किंवा अंपायरसोबत अनुचित शारीरिक संबंधात आला तर त्याला दोषी ठरवले जाते. (Latest sports updates)
मुख्य बाब म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बॅन किंवा दंड आकारण्यात आलेला नाही. कारण गेल्या २४ महिन्यांमध्ये त्याने पहिल्यांदाच असं काही केलं आहे.मात्र बुमराहला १ डिमेरीट पॉईंट देण्यात आला आहे.
भारतीय संघाचा पराभव..
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना इंग्लंडने २०२ धावा केल्या होत्या. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४२० धावा केल्या. यासह भारतीय संघाने या दुसऱ्या डावात १९० धावांची आघाडी घेतली होती.
मात्र भारतीय संघाला ही आघाडी टिकवून ठेवता आली नाही. कारण इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक करत ४३६ धावांचा डोंगर उभारला. यासह भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या २०२ धावा करता आल्या. भारतीय संघाला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.