vrinda-ganesh  twitter
Sports

WPL 2024: अभिमानास्पद! लिलावात कोट्यधीश होणारी Vrinda Dinesh आई-वडिलांसाठी करणार ‘ही’ गोष्ट; वाचून कौतुकच कराल

Vrinda Dinesh: या लिलावात भारताची युवा अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेशही (Vrinda Dinesh) कोट्यवधी झाली आहे. या लिलावात १.३० कोटींची बोली लागल्यानंतर वृंदा दिनेशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Ankush Dhavre

Vrinda Dinesh Wish For Her Parents:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ (Women's Premier League 2024) स्पर्धेसाठी शनिवारी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात परदेशी खेळाडूंसह भारतीय युवा खेळाडूंवर देखील पैशांचा पाऊस पाडण्यात आला. या लिलावात भारताची युवा अनकॅप्ड खेळाडू वृंदा दिनेशही (Vrinda Dinesh) कोट्यवधी झाली आहे.

तिच्यावर यूपी वॉरियर्सने (UP Warriors) १ कोटी ३० लाखांची बोली लावली. यासह ती वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात दुसरी सर्वाद महागडी अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरली आहे. या स्पर्धेत काशवी गौतम ही सर्वाधिक बोली लागलेली भारतीय अन्कॅप्ड खेळाडू ठरली होती. तिला २ कोटींची बोली लावत गुजरात जायंट्सने (Gujarat Giants) आपल्या ताफ्यात स्थान दिलं होतं.

या लिलावात १.३० कोटींची बोली लागल्यानंतर वृंदा दिनेशचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र तरीही तिने आपल्या आईला कॉल केला नव्हता. यामागचं कारण असं की, तिला चांगल्याने माहित होतं की,ही बातमी मिळताच तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणार नाही. यूपी वॉरियर्सशी बोलताना वृंदा म्हणाली की, ' मला असं वाटतं की तिच्या (आईच्या) डोळ्याच अश्रू होते. मी व्हिडिओ कॉल केला नव्हता. कारण, मी आईच्या डोळ्यात अश्रू पाहु शकत नव्हते. म्हणून मी तिला फक्त कॉल केला.'

कोट्यवधी रुपयांचं काय करणार?

वृंदा दिनेशवर १ कोटी ३० लाखांची बोली लावण्यात आली आहे. इतक्या पैशांचं काय करणार? असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की,'ते भारावून गेले आहेत, हे मला माहित होतं. त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांना माझा अभिमान वाटावा बसं इतकच हवं होतं मला. मी आई-वडिलांना ती कार घेऊन देईल, जी कार घेण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे. हेच माझं पहिलं ध्येय आहे. त्यानंतर पुढे बघू.' (Latest sports updates)

वृंदा दिनेशला आगामी हंगामात दिग्गज खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळणार आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली की,'एलिसा हेलीच्या नेतृत्वाखाली खेळणं, डॅनी वायट,ताहलिया मॅकग्रा आणि सोफी एक्लेस्टोन यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली खेळणं शानदार आहे. हे महिला क्रिकेटमधील महान खेळाडू आहेत. मी नेहमीच त्यांच्यासोबत खेळण्याचा विचार केला होता. पण हे स्वप्न सत्यात उतरेल असा मी कधीच विचार केला नव्हता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Kothare: महेश कोठारे म्हणाले मी मोदी भक्त; संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले - 'तात्या विंचू रात्री येऊन...'

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT