team india saam tv
Sports

Team India: टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाची कारकिर्द संपली? Asia Cup पाठोपाठ World Cup स्पर्धेलाही मुकणार..

Shreyas Iyer Injury: भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे,संघातील प्रमुख खेळाडू आशिया चषक स्पर्धेतून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे.

Ankush Dhavre

Asia Cup 2023: भारतीय संघासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे. कारण यावर्षी भारतीय संघाला आशिया चषक आणि आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धा तोंडावर असताना भारतीय संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसताना दिसून येत आहे.

संंघातील खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होताना दिसुन येत आहेत. दरम्यान भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे,संघातील प्रमुख खेळाडू आशिया चषक स्पर्धेतून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेपूर्वी श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तो बॉर्डर -गावसकर ट्रॉफी सुरु होण्यापुर्वी दुखापतग्रस्त झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली होती. मात्र तो अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकलेला नाही. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील त्याची उपस्थितीही संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. (Latest sports updates)

टाइम ऑफ इंडियाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'येत्या ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत श्रेयस अय्यरचं खेळणं कठीण दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. आता जुलै- ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी देखील त्याची निवड केली गेली नाही.'

यावरून स्पष्ट होत आहे की, श्रेयस अय्यरचं आशिया चषक खेळणं कठीण दिसून येत आहे. तो सध्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये दुखापतीतून स्वतःला सावरत आहे. त्याच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असली तरीदेखील त्याला अजूनही पाठीचा त्रास होत आहे. ज्यावेळी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली गेली होती, त्यावेळी असे म्हटले जात होते की, तो वर्ल्ड कपपर्यंत फिट होऊन मैदानात उतरू शकतो. मात्र आता त्याचं आशिया चषक स्पर्धा खेळणं देखील कठीण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : मुलासाठी आईने सरकारी नोकरी सोडली, चौथी फेल लेक झाला IRS अधिकारी, चौथ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक

Maharashtra Live News Update: बदलापूरनंतर वांगणी जवळच्या कराव गावात बिबट्याची दहशत

Pune Police: आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

Telangana Accident: महाराष्ट्रातील मजुरांचा तेलंगानामध्ये भयंकर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT