नवी दिल्ली : आशिया कप 2022 महिला क्रिकेटची रणधुमाळी सुरू असून आज भारत आणि श्रीलंका यांच्यात निर्णायक अंतिम सामना होत आहे. आशिया टी-20 करंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केलीय. दरम्यान, आज श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना पव्हेलिनचा रस्ता दाखवला. त्यामुळे श्रीलंकेला 20 षटकांत 9 विकेट्स गमावत फक्त 65 धावाच करता आल्या. त्यामुळे आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. (Srilanka sets target of 66 runs for india)
भारताची गोलंदाज रेणुका सिंह आणि रिचा घोषने पॉवरप्लेमध्येच श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटूला अवघ्या 6 धावांवर बाद केलं. त्यानंतर रेणुकाने पुढील षटकात श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. श्रीलंकेची फलंदाज हर्षता मादवीला फक्त एक धावेवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
विशेष म्हणजे रेणुकाच्या चौथ्या षटकात हर्षता बाद झाल्यानंतर लगेच चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनीला तंबूत पाठवलं. पाचव्या चेंडूवर रेणुकाने हसिनी परेराला भोपळाही फोडू दिला नाही. परेरा शून्यावर बाद झाल्याने 9 धावांवरच श्रीलंकेचे चार फलंदाज बाद झाले.
रेणुकाने सहाव्या षटकातही भेदक गोलंदाजी केली. तिने कविशा दिलहारीलाही एका धावेवर त्रिफळा उडवून बाद केलं. तसेच भारताची गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्यानं श्रीलंकेची धावसंख्येला ब्रेक लावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.