T20 World Cup, Team India, Rohit Sharma : टी २० वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. भारताची पहिली लढत पाकिस्तानसोबत होणार आहे. पण त्याआधीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) केवळ पाकिस्तानच नव्हे, तर उर्वरित सगळ्या संघांच्या कर्णधारांना थेट इशाराच दिला आहे. सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा एक्स फॅक्टर असून, त्याला रोखून दाखवाच, असं आव्हान रोहितनं दिलं.
मेलबर्नमध्ये पत्रकार परिषदेला १६ कर्णधार एकत्रित आले होते. त्यावेळी रोहित शर्माने संधी साधली आणि सर्वच कर्णधारांना थेट इशाराच दिला. सूर्यकुमार यादव हा आमचा महत्वाचा खेळाडू असून, टीम इंडियाचा (Team India) एक्स फॅक्टर आहे, असं त्यानं सांगून टाकलं. (Cricket News)
T20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मेलबर्नमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. सर्व कर्णधारांनी आपापली मते मांडली. स्पर्धा आणि तयारी याबाबत सर्वांनी सांगितले. अनेकांनी आपापल्या खेळाडूंची नावे घेतली. संघाचे बलस्थान काय आहे, हे सांगितलं. पण रोहित शर्माने यावेळी केवळ एकाच खेळाडूचं नाव घेतले. सूर्यकुमार यादव आमचा एक्स फॅक्टर आहे, हे सांगायला तो विसरला नाही. (Latest Marathi News)
रोहित शर्माने सूर्यकुमार यादवचं नाव घेतानाच, सर्व कर्णधारांना इशाराच दिला. यावेळी विराट कोहली किंवा हार्दिक पंड्या नाही, तर सूर्यकुमार यादव हा सर्वात खतरनाक खेळाडू ठरेल, असे तो म्हणाला. सूर्यकुमार यादव हा आमच्या संघाचा एक्स फॅक्टर आहे. तो सध्या फॉर्मात आहे आणि तो टी २० वर्ल्डकप स्पर्धेतही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी तो आपल्या फलंदाजीच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करेल, असेही रोहित शर्मा यावेळी म्हणाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.