steve smith twitter
Sports

SL vs AUS: स्टीव्ह स्मिथचं विक्रमी शतक! राहुल द्रविड- जो रुटच्या रेकॉर्डशी बरोबरी; विराटला तर खूप मागे सोडलं

Steve Smith Record Breaking Century, SL vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने सलग दुसरे शतक झळकावले आहे. यासह त्याने दिग्गजांना मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची बॅट चांगलीच तळपतेय. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावले आहे.

या शतकी खेळीसह तो वर्तमानात संयुक्तरित्या सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट आणि भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या तिन्ही फलंदाजांच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३६ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

स्टीव्ह स्मिथबद्दल बोलायचं झालं, तर गेल्या ८ डावात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आहे. बॉर्डर- गावसकर मालिका सुरु असताना ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावात त्याने शानदार फलंदाजी करताना १०१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मेलबर्न कसोटी सामन्यादरम्यान त्याने भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर टिचून फलंदाजी करत १४१ धावांची खेळी केली होती. आता दुसऱ्या कसोटीतही त्याने शानदार शतकी खेळी केली आहे. (Steve Smith Record)

मास्टर ब्लास्टर अव्वल स्थानी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटींगच्या नावे ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्ड आहे. त्याने ४१ शतकं झळकावली आहेत.

तर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिसच्या नावे ४५, कुमार संगकाराच्या नावे ३८, केन विलियम्सनच्या नावे ३३ आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावे ३० शतकं झळकावण्याची नोंद आहे.

स्टीव्ह स्मिथची शानदार फलंदाजी

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याने कर्णधार म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील १७ वे शतक झळकावले आहे. तर आशिया खंडात खेळताना त्याने कसोटीतील सातवे शतक झळकावले आहे. या शानदार शतकी खेळीच्या बळावर स्मिथने ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT