Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास! सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही सोडलं मागे

SL vs AUS, Steve Smith Record: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे.
Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास! सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही सोडलं मागे
steve smithtwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३-१ ने पराभव करत मालिका खिशात घातली. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ हात करताना दिसून येणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास! सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही सोडलं मागे
IND vs ENG: असं कोण खेळतं? हार्दिकच्या फ्लॉप शोनंतर दिग्गज खेळाडू भडकला, गंभीरलाही झापलं

भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती. मात्र हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला होता. आता श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्याच कसोटीत त्याने कसोटीत १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याने ९,९९९ धावा केल्या होत्या.

दरम्यान १ धाव घेताच त्याने १०,००० धावांचा पल्ला गाठला. असा कारनामा करणारा तो जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ अॅलन बॉर्डर, स्टीव वॉ आणि रिकी पाँटींगला हा कारनामा करता आला आहे.

Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास! सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही सोडलं मागे
IND vs ENG: पुण्यात विस्फोटक फलंदाजाला संधी मिळणार? चौथ्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेइंग ११

सचिन तेंडुलकरला सोडलं मागे

यासह स्टीव्ह स्मिथने मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही मागे सोडलं आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे. यासह सर्वात वेगवान धावा करणारा तो कुमार संगकारासह दुसराच फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये वेस्टइंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा अव्वल स्थानी आहेत.

त्यांनी १११ कसोटी सामन्यांमध्ये हा कारनामा केला होता. तर सचिनने हा कारनामा १२२ सामन्यांमध्ये केला होता. आता स्मिथने हा कारनामा ११५ व्या सामन्यात केला आहे. यापूर्वी कुमार संगकारानेही हा कारनामा ११५ व्या सामन्यात करुन दाखवला होता.

Steve Smith: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास! सर्वात मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही सोडलं मागे
IND vs ENG: वरुणचा 'पंच', राजकोटमध्ये ५ गडी बाद करताच रचला इतिहास

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा करणारे फलंदाज

ब्रायन लारा- १११ सामने

कुमार संगकारा- ११५ सामने

स्टीव्ह स्मिथ - ११५ सामने*

यूनिस खान- ११६ सामने

रिकी पाँटींग- ११८ सामने

जो रूट- ११८ सामने

राहुल द्रविड- १२० सामने

सचिन तेंडूलकर- १२२ सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com