
भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. ऑस्ट्रेलियात ५ डावात फलंदाजी करताना त्याला अवघ्या २९ धावा करता आल्या होत्या.
जर्सीची रंग बदलल्यानंतर रोहितचा फॉर्म बदलू शकतो, असं म्हटलं जात होतं. मात्र कसोटी पाठोपाठ वनडेतही रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत रोहित अवघ्या २ धावा करत माघारी परतला. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना ४ गडी राखून जिंकला आहे. मात्र रोहित शर्माची बॅट या सामन्यातही शांतच राहिली. या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली.
यशस्वीने काही चौकार खेचले, पण तो अवघ्या १५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रोहितनेही अवघ्या २ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. फॅन्स रोहित फॉर्ममध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. मात्र तो बाद होताच मैदानात शुकशुकाट पाहायला मिळाला.
पहिला वनडे सामना झाल्यानंतर, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात दोघेही चर्चा करताना दिसून येत आहेत. यादरम्यान रोहित शर्मा गौतम गंभीरला काहीतरी समजवताना दिसून येत आहे. दरम्यान हा फोटो व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. काहींच्या मते, गंभीर रोहितच्या फलंदाजीबाबत चर्चा करताना दिसून येत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली वनडे मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका झाल्यानंतर १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत तरी रोहितची बॅट चालणं गरजेचं असणार आहे. जर या स्पर्धेतही तो फ्लॉप ठरला, तर त्याच्याकडे निवृ्त्ती घेण्याशिवाय पर्याय नसेल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.