IND vs SL: श्रीलंकेच्या चिंतेत वाढ; सराव न करताच खेळावा लागणार सामना
IND vs SL: श्रीलंकेच्या चिंतेत वाढ; सराव न करताच खेळावा लागणार सामना Twitter/ @@OfficialSLC
क्रीडा | IPL

IND vs SL: श्रीलंकेच्या चिंतेत वाढ; सराव न करताच खेळावा लागणार सामना

वृत्तसंस्था

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात 13 जुलैपासून 3 टी -20 आणि तीन एकदिवसीय मालिकेचे आयोजन केले जात आहे. पण, श्रीलंका क्रिकेट संघाला (Sri Lanka Team) त्यांच्या यजमान पदाचा काहीच फायदा होणार नाहीये. कारण श्रीलंकेचा सामना भारता सारख्या भलाढ्य संघाशी होणार आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ (Team India) मालिकेसाठी कसून सराव करत आहे. परंतु दासुन शनाका याच्या नेतृत्वात श्रीलंका कोणताही सराव न करता मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. ( Sri Lanka Will played first ODI match without practice)

श्रीलंकेच्या संघाला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचा विलगीकरण कालावधी 12 जुलैला संपणार आहे. त्याचबरोबर पहिला एकदिवसीय सामना (First ODI-1) 13 जुलै रोजी खेळला जाणार आहे. श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवरचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या आहेत. माध्यमांना उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी इंग्लंडहून परत आलेल्या खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले होते. स्थानिक प्रोटोकॉलनुसार, त्यांना सराव सत्रात भाग घेण्यास परवानगी देण्यापूर्वी सक्तीने 7 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार होते.

श्रीलंका क्रिकेटचे निवडकर्ता प्रमोद विक्रमसिंघे म्हणाले, “आम्ही या परिस्थितीत मदत करू शकत नाही. सध्या आपण ज्या परिस्थितीमध्ये राहत आहोत त्यानुसार अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार संघाला सर्व आरोग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करावे लागेल. ज्या खेळाडूंना संघात खेळवले जाईल त्यांना पहिल्या सामन्यासाठी नेट सराव करता येणार नाही.

चांगली गोष्ट आहे की त्या खेळाडूंमधील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आला नाही''. विशेष म्हणजे 6 जुलै रोजी इंग्लंडहून आल्यानंतर संपूर्ण संघाची कोरोना चाचणी झाली होती. सर्व खेळाडूंच्या चाचण्या नेगेटिव्ह आल्या, परंतु श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. सध्या संपूर्ण टीम कोलंबोमधील हॉटेलमध्ये विलगीकरणात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT