Tokyo Olympics: 'सोने की चिडिया' असलेल्या भारताचा 'सुवर्ण' इतिहास तोकडाच!

भारताच्या बाजूने विचार केला तर 121 वर्षापूर्वी भारताने प्रथम: ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.
Indian Hockey Team
Indian Hockey TeamOlympics.cpm
Published On

प्रविण ढमाले

जपानची राजधानी टोकियो येथे होणारी खेळांची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक (Olympic Games Tokyo 2020) 23 जुलैपासून सुरू होणार आहे. यंदाचा टोकियो ऑलिम्पिकचा रणसंग्राम 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताच्या बाजूने विचार केला तर 121 वर्षापूर्वी भारताने प्रथम: ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. सन 1900 मध्ये भारताने प्रथमच (India in Olympics) ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. त्यावेळी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये एका खेळाडूने देशाचे प्रतिनिधित्व केले. नॉर्मन प्रिचार्डने भारताला दोन पदके मिळवून दिली होती. तथापि, पहिल्यांदाच देशाला सन 1928 मध्ये सुवर्णपदक मिळाले होते. भारतीय हॉकी संघाने (Indian hockey in Olympics) हे सुवर्ण पदक जिंकले होते.

अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने नेदरलँड्सचा 3-0 असा पराभव करून देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्या सामन्यात हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेजर ध्यानचंदने दोन गोल केले होते. सुमारे 23 हजार लोकांनी हा सामना पाहिला. यानंतर 1932 मध्ये देशाला दुसरे सुवर्णपदक मिळाले. भारतीय हॉकी संघाने दोन सामने लगातार जिंकून अमेरिकेच्या लान्स एंजलिसमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत संघाने एकूण 35 गोल केले होते. त्यावेळी समोरच्या संघाने केवळ दोन गोल केले होते. भारताने जपानला 11-1 असे पराभूत केले होते. या सामन्यात ध्यानचंदने चार गोल केले. त्यानंतर दुसर्‍या सामन्यात अमेरिकेला भारताने 24-1 ने पराभूत केले. त्या सामन्यात रूप सिंगने 10 तर ध्यानचंदने 8 गोल केले होते.

Indian Hockey Team
'त्या' ऑलिम्पिक स्पर्धेत फक्त एकच भारतीय; पदक जिंकल्यावर सोडला होता देश

हॉकीने भारताला ऑलिम्पिकमधील तिसरे सुवर्णपदकही दिले. हॅाकी संघाने तानाशाहा हिटलरच्या जर्मनिला हरवले होते. या सामन्यात भारताने जर्मनीला 8-1 असे पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली होती. सामन्यात ध्यानचंदने चार गोल केले होते. स्वातंत्र्यापूर्वीचे हे भारताचे शेवटचे सुवर्णपदक होते. कारण दुसरे महायुद्ध झाल्यामुळे 1940 आणि 1944 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी भारताला तीन सुवर्णपदके मिळाली होती. ते तिनही पदक हॉकीमधून जिंकले होते. या दरम्यान दोन सिल्व्हर पदक जिंकले होते ते नॉर्मन प्रीचर्डने जिंकले होते.

1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला 1948 मध्ये प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. यावेळीही हॉकी संघाने चमत्कार केला. अंतिम सामन्यात त्यांनी ब्रिटनला पायदळी तुडवले. ब्रिटनचा 4-0 असा पराभव झाला. तथापि, यावेळी एक कमतरता होती. हॉकीचा जादूगार ध्यानचंद टीमबरोबर नव्हता. तोपर्यंत त्याने व्यावसायिक हॉकीपासून स्वत: ला दूर केले होते. यानंतर स्वतंत्र भारतातील दुसरे सुवर्ण पदक 1952 मध्ये आले. पुन्हा एकदा हॉकी संघाने चमत्कार केला. हे यश हेलसिंकी (फिनलँड) मध्ये मिळवले. अंतिम सामन्यात भारताने पुन्हा एकदा नेदरलँडचा पराभव केला.

Indian Hockey Team
धोनीच्या नावावर आहे जगातील सर्वात वेगवान विक्रम

हॉकी संघाने तो सामना 6-1 असा जिंकला. यानंतर 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ऐतिहासिक सामन्यात पाकिस्तानला 1-0 ने पराभूत केले. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा विजयाचा मार्ग तुटला होता. त्यानंतर सुवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने 1-0 असे भारताला पराभूत केले होते. चार वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या पराभवाचा त्यांनी बदला घेतला होता.

1964 मध्ये पुन्हा एकदा हॉकी संघ सुवर्ण जिंकण्यात यशस्वी झाला. ऑलिम्पिकमधील हे भारताचे सातवे आणि स्वातंत्र्यानंतरचे दुसरे सुवर्णपदक आहे. हॉकी संघाने पुन्हा एकदा टोकियोमध्ये पाकिस्तानला 1-0 ने हरवून सुवर्ण जिंकले. त्यानंतर पुढील दोन ऑलिम्पिकमध्ये 1968 आणि 1972 मध्ये हॉकी संघाला केवळ कांस्यपदक मिळवता आले. 1976 मध्ये प्रथमच या संघाला कोणतेही पदक मिळाले नाही. त्यावेळी सातव्या संघ सातव्या क्रमांकावर राहिला होता. 1980 मध्ये हॉकी संघाने पुनरागमन केले आणि मॉस्कोमध्ये सुवर्णपदक जिंकले. हॉकीमधील हे भारताचे शेवटचे पदक होते. त्यानंतर आतापर्यंत भारताला कोणतेही यश मिळवता आलेले नाही.

हॉकी सोडून इतर खेळांबद्दल बोलताना 1980 नंतर भारताला 2008 मध्ये पहिले सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. वैयक्तिक खेळात सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा एकमेव खेळाडू आहे. हॉकी व्यतिरिक्त इतर खेळात त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. स्वातंत्र्याला 74 वर्षे झाली असून देशात फक्त ५ सुवर्ण पदके झाली आहेत. यानंतर, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून अनेक सुवर्ण पदकांची आशा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com