HappyBirthdayMSDhoni: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) 40 वर्षांचा झाला आहे. कर्णधारपदी धोनीने टीम इंडियामध्ये (Team India) असे अनेक विक्रम केले आहेत. जे कधिही विसरले जाऊ शकत नाही. धोनी कर्णधार म्हणून यशस्वी आहेच परंतू फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणूनही त्याने चमत्कार केले आहेत. त्याने यष्टांच्या मागे अनेक विक्रम केले आहेत. धोनी क्रिक्रटच्या इतिहासात सर्वात जलद स्टपिंग करणारा खेळाडू आहे.
धोनीच्या नावावर सर्वाधिक स्टपिंग
महेंद्रसिंग धोनी हा जगातील एकमेव यष्टिरक्षक आहे ज्याने यष्टांच्या मागे 150 हून अधिक स्टपिंग केले आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत एकूण 195 स्टंपिंग केले आहेत ज्यामध्ये कसोटी सामन्यात 38, एकदिवसीय सामन्यात 12 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 स्टपिंगचा समावेश आहे. धोनीनंतर कुमार संगकारा 139 स्टंपिंगसह दुसर्या स्थानावर आहेत. तर 101 स्टंपिंगसह रोमेश कलुवितरणा तिसर्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये विकेटच्या मागे सर्वाधिक शिकार करण्याच्या बाबतीत धोनी भारतासाठी पहिल्या क्रमांकावर आहे आणि विकेटच्या मागे त्याच्याकडे एकूण 829 जणांना बाद करण्यात आले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर विकेटच्या मागे सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्क बाऊचर 998 बळिंसह प्रथम आणि अॅडम गिलख्रिस्ट 905 बळिंसह दुसऱ्या स्थानवर आहे.
वेगवान स्टम्पिंगचा विक्रम धोनीच्या नावावर
धोनी यष्टांच्या मागे अत्यंत वेगवान असायचा आणि खेळाडू बाद करण्याच्या त्याचा अंदाज वेगळा असायचा. धोनीने सर्वात कमी वेळात स्टपिंग करण्याचा विक्रम नोंदवला आहे. धोनीने 0.08 सेकंदात स्टपिंग करण्याचा विक्रम नोंदवला आहे. सन 2018 मध्ये त्याने मुंबईत खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात 0.08 सेकंदात स्टंपिंग करुन वेस्ट इंडिजचा खेळाडू किमो पॉलला पॅवेलियनकडे पाठवले होते. इतकेच नाही तर जगातील सर्वात वेगवान स्टम्पिंगच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावरही धोनीच आहे. 2012 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल मार्शला 0.09 सेकंदात स्टपिंग करुण बाद केले होते. धोनीने 15 अॅगस्ट 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिक्रेतमधून निवृत्ती घेतली होती.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.