Nuwan Thushara Google
Sports

Nuwan Thushara: श्रीलंकेच्या नुवान तुषाराची ऐतिहासिक हॅटट्रिक; मुंबई इंडियन्सचा पैसा वसूल होणार?

Sri Lanka Bowler Nuwan Thushara: काही दिवसांत आयपीएल २०२४ सुरू होत आहे. यंदा मुंबई इंडियन्समध्ये बरीच उलथापालथ पाहायला मिळणार आहे.

Rohini Gudaghe

IPL 2024 Sports News

आयपीएल स्पर्धा २०२४ (IPL 2024) सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मुंबई इंडियन्समध्ये यंदाच्या वर्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील आघाडीच्या संघांपैकी एक मानला जातो. त्यामध्ये भारताचा हिटमॅन रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूचा समावेश आहे. या यादीत आता रायझिंग स्टारची भर पडण्याची शक्यता आहे. (Cricket news in marathi)

नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२४ च्या लिलावादरम्यान, मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराला (Nuwan Thushara) ४.८ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी तुषारा टी-२० मध्ये करताना दिसत आहे. शनिवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नुवान तुषाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयपीएल २०२४

या सामन्यात तुषाराने हॅटट्रिक घेतली. नझमुल शांतो, तौहीद हृदय, महमदुल्लाह यांना बाद केलं होतं, अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पाचवा खेळाडू ठरला (Sri Lanka Bowler Nuwan Thushara) आहे. तुषाराने तुषाराच्या भेदक माऱ्यापुढे बांग्लादेशचा संघ गारद झाला. बांगलादेशचा सामन्यात तीन विकेट्सने पराभव झाला.

आयपीएलपूर्वीचं नुवानची हॅटट्रिक मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक चांगली बातमी ठरली आहे कारण मुंबईच्या संघाने २०२४ मध्ये गोलंदाजीच्या यादीमध्ये मोठा बदल केला आहे. २२ मार्चपासून आयपीएल २०२४ च्या सामन्यांना सुरूवात होणार ( Sports News) आहे.

कोण आहे नुवान तुषारा?

नुवान तुषाराने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तुषाराची बॉलिंग स्टाईल श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा याच्यासारखीच आहे. तुषाराने २०१५-१६ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. २०२० मध्ये, नुवान तुषाराला पहिल्या लंका प्रीमियर लीगमध्ये गॅले ग्लॅडिएटर्स या संघाने विकत घेतले (Cricket News) होते. नुवान तुषाराने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी ८६ टी-२० सामन्यात ११५ विकेट घेतल्या आणि ८ टी-२० सामन्यात ११ विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT