Cricket Stadium : बीडमध्ये राष्ट्रीय दर्जाचं 65 कोटींचे क्रिकेट स्टेडियम उभारणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

Dhananjay Munde on Cricket Stadium : 'राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी क्रिकेट स्टेडियमसाठी निधी मंजूर केला आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर भूमिपूजन होईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली
Cricket Stadium
Cricket Stadium Saam tv
Published On

Dhanjay Munde News :

बीडच्या परळी शहरात 65 कोटी रूपये खर्च करुन राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बनवण्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निधी मंजूर केला आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर भूमिपूजन होईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली. (Latest Marathi News)

परळी शहरात आयोजित नामदार चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, झहीर खान यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

आयपीएलच्या धर्तीवर बीपीएल देखील खेळवले जाणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली. 'नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी परळी शहरांमध्ये नामदार चषक टेनिस बॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सातशे खेळाडूंची पुढच्या वर्षी आयपीएलच्या धर्तीवर पीपीएलमध्ये बोली लावली जाणार, असं धनजंय मुंडे यांनी सांगितलं.

संयोजक अजय मुंडे काय म्हणाले?

'ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी व्यासपीठ निर्माण करण्यासाठीच नामदार चषक आयोजन केलं असल्याचा संयोजक अजय मुंडे यांनी सांगितलं.

जहीर खान काय म्हणाला?

माजी क्रिकेटपटू जहीर खान म्हणाला, 'क्रिकेट पाहून खूप आनंद झाला. मी श्रीरामपूरमधील आहे, मी अशा टुर्नामेंटमध्ये खूप खेळलो. परळी शहराला अशा सुविधा मिळाल्या तर नक्कीच चांगले खेळाडू घडतील. देशासाठी खेळायची संधी मिळेल. सर्वाना शुभेछा'.

युवराज सिंग काय म्हणाला?

युवराज सिंग म्हणाला, 'मी छोट्या शहरातून पुढे आलो आहे. टेनिस बॉलपासून सुरूवात केली. बीडमध्ये स्टेडियम होत असेल तर मोठी बाब आहे. छोट्या शहरात क्रिकेटचा खरा आनंद आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com