SRH vs RR Qualifier 2 
Sports

SRH vs RR, Head To Head Record: करो या मरो लढतीत कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

SRH vs RR, Qualifier 2: आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ थेट आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही. या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघ १९ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान सनरायझर्स हैदराबादने १० सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाला केवळ ९ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

क्वालिफायर १ मध्ये पराभव

क्वालिफायर १ चा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात हैदराबादचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला. या संघाला प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १६० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ३८ चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकला. आता हैदराबादकडे दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे राजस्थानने एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभूत केलं.

कोण मारणार बाजी?

क्वालिफायर २ च्या सामन्यात दोन्ही संघामध्ये जोरदारल लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हा सामना जिंकून दोन्ही संघांना फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाकडे झुकतं माप असणार आहे. तर हैदराबादची फलंदाजी मजबूत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT