हैदरबादचा संघ लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धच्या सामन्यात ३०० धावांचं टार्गेट डोक्यात घेऊन मैदानात उतरला होता. लखनऊने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं.
मात्र नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजांना या डावात आक्रमक सुरुवात करता आली नाही. लखनऊमध्ये नुकताच दाखल झालेल्या शार्दुल ठाकूरने अभिषेक शर्णा आणि इशान किशनला बाद करत माघारी धाडलं.
या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड ही जोडी मैदानावर आली होती. या जोडीकडून विस्फोटक सुरुवातीची अपेक्षा होती.
मात्र असं काही झालं नाही. शार्दुलने अभिषेकला निकोलस पूरनच्या हातून झेल बाद करत माघारी धाडलं. शार्दुलने त्याला शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो डीप स्क्वेअर लेगवर पुरनच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशनकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र त्यालाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. अभिषेक पाठोपाठ इशानचाही नंबर लागला. शार्दुलने टाकलेला चेंडू टप्पा पडून बाहेर चालला होता. या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला. इशान किशनने गेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली होती. मात्र या सामन्यात त्याला पहिल्याच सामन्यात बाद होऊन माघारी परतावं लागलं.
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्ष), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
लखनऊ सुपर जायंट्स: एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.