सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायटन्स हा सामना रंगत आहे. या सामन्यामध्ये रिषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये हैदराबादच्या फलंदाजांवर लखनऊच्या गोलदाजांनी काहीसा दबाव टाकून ठेवला. हैदराबाद संघाचे बरेचसे खेळाडू स्वस्तात माघारी परतले.
अभिषेक शर्मा ६ तर इशान किशन शून्यावर बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेडने ४७ धावा केल्या. हेड आउट झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन खेळू लागले. त्यानंतर क्लासेन देखील २६ धावा करुन माघारी परतला. चौदाव्या ओव्हरमध्ये नितीश कुमार रेड्डी पहिल्या बॉलवर आउट झाला. त्याने ३२ धावा केल्या होत्या.
चौदाव्या ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी प्रचंड रागावला. तो रागारागात मैदानाच्या बाहेर पडला. ड्रेसिंग रुममध्ये जाताना नितीश कुमार रेड्डीने जोरात हेल्मेट आपटले. त्याच्या या अॅक्शनचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आउट झाल्याने रागात केलेल्या कृत्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
लखनऊची प्लेईंग ११ -
एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), अब्दुल समद, डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव
हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.