kaviya maran hugged her father twitter
Sports

Kavya Maran Viral Video: आनंद गगनात मावेना! हैदराबादचा विजय अन् काव्या मारनची वडिलांना मिठी- Video

SRH vs RR, IPL 2024: सनरायझर्सने या सामन्यात शानदार विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान या विजयानंतर काव्या मारन जल्लोष साजरा करताना दिसून आली आहे.

Ankush Dhavre

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये या संघाचा सामना २ वेळचा विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघामध्ये पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ३६ धावांनी जिंकत फायनलचं तिकीट मिळवलं. यासह २०१६ नंतर सनरायझर्स हैदराबादला पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्याची संधी असणार आहे.

सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये एन्ट्री करताच काव्या मारनचा आनंद गगनात मावेनासा झाला. सामन्यानंतर तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. २० व्या षटकातील शेवटचा चेंडू पडताच काव्या मारनने आपल्या वडिलांना मिठी मारली. विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आली. कॅमेऱ्यामनने हे क्षण टिपले. दरम्यान व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

काव्या मारन आहे तरी कोण?

काव्या मारनचे वडील सन ग्रुपचे मालक आहेत. तसेच ती माजी केंद्रीयमंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. सध्या ती सन टीव्ही नेटवर्कचा ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्ट्सची प्रमुख आहे. तिचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोवर्स आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी हैदराबादने २० षटकअखेर ९ गडी बाद १७५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करतां राजस्थान रॉयल्सला १३९ धावा करता आल्या. हा सामना राजस्थानला ३६ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Juvekar: हिंदी नाटक करतोय उद्या हिंदी चित्रपटही...; संंतोष जुवेकरच्या वडिलांनी व्यक्त केली खास इच्छा

Maharashtra Live News Update: गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा देविदास गायकवाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...

Hair Mask: किचनमधील 'या' ३ गोष्टींपासून बनवा हेअर मास्क, केस होतील मजबूत

Tuesday Horoscope : आज सावध रहा… विश्वासूच देऊ शकतात धोका; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT