sreeja akula twitter
Sports

Paris Olympics 2024: श्रीजा अकुलाने रचला इतिहास! ऑलिंपिक स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारी ठरली दुसरीच महिला खेळाडू

Sreeja Akula Created History in Paris Olympics: भारताची टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरु आहे. स्पर्धेतील पाचव्या दिवशी टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाने इतिहास रचला आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. असा कारनामा करणारी ती मनिका बात्रानंतर दुसरीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने जिआन जेंगचा ४-२ ने पराभव केला आहे.

ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात असा कारनामा कुठल्याच महिला खेळाडूंना करता आला नव्हता. मात्र मानिका बात्राने राऊंड ऑफ ३२ मध्ये प्रितिका पावडेला पराभूत करत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला होता. आता श्रीजा अकुलाने जिआन जेंगला पराभूत केलंय. या दोन्ही महिला खेळाडूंची नावं भारतीय ऑलिंपिकच्या इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहेत.

श्रीजा अकुला आणि जिआन जेंग या दोघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोघांनी एकमेकांना पराभूत करण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र शेवटी श्रीजा अकुलाने बाजी मारली आणि सिगांपूरच्या जिआन जेंगला ४-२ ने पाणी पाजलं.

या सामन्यातील सुरुवातीच्या सेटमध्ये जिआन जेंगने श्रीजा अकुलाला पराभूत केलं. मात्र श्रीजा खचून गेली नाही, तिने पुढील ३ सेट्समध्ये जिआन जेंगला पाणी पाजलं आणि ३-१ ने आघाडी घेतली. जिआन जेंगला दिसत होतं की, श्रीजाला बॅकहँड खेळताना अडचणीचा सामना करावा लागतोय. मात्र श्रीजाने फोरहँड अटॅक सुरु ठेवला. चौथ्या सेटमध्ये श्रीजाला पराभवाचा सामना करावा लागला. जिआन जेंगने ३-२ ने मुसंडी मारली होती. मात्र सहावा सेट जिंकत श्रीजाने इतिहास रचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT