Sports

किरकोळ वादात ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा मृत्यू, आरोपीला अटक

डेव्हिडसन सिडनीमधील रहिवाशी होते. 2010 आणि 2011 मध्ये त्यांनी वर्ल्ड सर्फिंग टूरमध्ये भाग घेतला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिडनी : ऑस्ट्रेलियातून अत्यंत वाईट बातमी येत आहे. पब बाहेर झालेल्या किरकोळ वादात एका दिग्गज खेळाडूला जीव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सर्फिंग स्टार ख्रिस डेव्हिडसन याचा सिडनीच्या उत्तरेकडील एका पबबाहेर किरकोळ वादानंतर झालेल्याया हाणामारीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिडसन यांचे पबबाहेर एका व्यक्तीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यावर एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली. या वादात समोरील व्यक्तीने डेव्हिडसन यांना जोरदार बुक्का मारला. त्यानंतर डेव्हिडसन रस्त्यावरच कोसळला. यात त्याचे डोके फुटपाथवर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 42 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर क्रिस डेव्हिडसन यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, कोर्टाने आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे.

डेव्हिडसन सिडनीमधील रहिवाशी होते. 2010 आणि 2011 मध्ये त्यांनी वर्ल्ड सर्फिंग टूरमध्ये भाग घेतला होता. 1996 मध्ये ऑस्ट्रेलियातील बेलेस बीच येथील रिप कर्ल प्रो येथे वाइल्डकार्ड एंट्री दिल्यानंतर वयाच्या 19 व्या वर्षी ते प्रसिद्ध झाले होते. त्यांनी सलग दोन हीटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन केली स्लेटरचा पराभव केला होता.

डेव्हिडसन यांच्या मृत्यूनंतर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली, यात मिस्टर स्लेटर यांचाही समावेश होता. 11 वेळा विश्वविजेत्याने इंस्टाग्रामवर लिहिले, 'या व्यक्तीसोबत खूप चांगले सामने झाले. तो सर्वात प्रतिभावान सर्फर्सपैकी एक होता. सर्फिंग न्यू साउथ वेल्सचे कार्यकारी संचालक मार्क विंडन म्हणाले की, मिस्टर डेव्हिडसन हे आजपर्यंतच्या ऑस्ट्रेलियातील सर्वात स्टायलिश सर्फर्सपैकी एक होते.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला विंडन यांनी सांगितले की, 'तो पाण्यामध्ये जितका कुशल होता तितकाच तो एक मोठा व्यक्तिमत्त्व होता. त्यांचे जीवन अशा प्रकारे संपले हे खरोखरच दुःखद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT