वॉशिंग्टन: जगावर येणारं मोठं संकट अमेरिकेने रोखलं आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या एका मोठ्या मोहीमेला यश मिळालं आहे. मिशन डार्ट (Double Asteroid Redirection Test) असं या मोहीमेचं नाव आहे. या मोहीमेअंतर्गत नासाच्या डार्ट नावाच्या अंतराळयानाने एका लघुग्रहाला धडक दिली आहे. नासाचं डार्ट हे यान डिमोफोर्स (Dimorphos) नावाच्या एका लघुग्रहाला (Asteroid ) धडकलं आहे. (Nasa Dart Mission Latest News)
हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत होता. फुटबॉलच्या मैदानाइतक्या आकाराचा असलेला हा लघुग्रह पृथ्वीला धडकू नये यासाठी नासानं (Nasa) आपलं डार्ट हे यान त्या लघुग्रहाला धडकवलं. यामुळे लघुग्रहाच्या परिक्रमाची दिशा बदलली जाऊन तो लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर करावा हे नासाचं मिशन होतं. नासाचा हा प्रयोग भविष्यात पृथ्वीवर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.
डार्ट मिशनचे हे यान सुमारे १० महिन्यांपूर्वी पृथ्वीवरुन रवाना झाले होते. पृथ्वीचे (Earth) रक्षण करण्यासाठी या यानाची जाणूनबुजून डिमॉर्फोस या लघुग्रहाशी टक्कर करण्यात आली. २४,००० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करणाऱ्या डार्टची आज डिमॉर्फोसशी टक्कर झाली. या चाचणीद्वारे नासा कायनेटिक इम्पॅक्टर तंत्रज्ञानाची चाचणी करत आहे. या आधारे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या भविष्यातील लघुग्रहांपासून पृथ्वीचे संरक्षण केले जाणार आहे. वास्तविक, या लघुग्रहांमुळे पृथ्वीवरील संपर्क यंत्रणा आणि उपग्रह इत्यादींचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे नासा दीर्घ काळापासून या समस्येचे निराकरण करण्यासाठी या तंत्रज्ञानाची तयारी करत आहे.
डिमॉर्फोस हा डिडीमॉस लघुग्रह प्रणालीचा एक भाग आहे. नासाचे यान त्याला धडक देऊन दुसऱ्या कक्षेत ढकलेल. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणि हबल टेलिस्कोपसह सर्व कॅमेरे आणि दुर्बिणींद्वारे संपूर्ण घटना आणि त्याच्या प्रभावाचे निरीक्षण नासाकडून केले जात आहे. डिमॉर्फोस पृथ्वीपासून ९६ लाख किलोमीटर दूर आहे. त्याचे नाव ग्रीक शब्द 'didymos' वर आधारित आहे. म्हणजे जुळे. वास्तविक हा २५०० फूट उंच लघुग्रह 'डिडिमोस'चा भाग आहे. डिडिमॉसचा शोध १९९६ मध्ये लागला होता.
नासाच्या या डार्ट मिशनमध्ये फक्त एकाच उपकरणाचा समावेश आहे. लघुग्रहाचा पाठलाग करणे, त्याला लक्ष्य करणे आणि त्याची दिशा बदलणे हे त्याचे काम आहे. या प्रक्रियेत लघुग्रहाचे अनेक तुकडे करण्यात आले. मात्र, नासाच्या या महत्त्वाच्या मोहिमेच्या यशाची संपूर्ण आकलन करण्यासाठी काही आठवडे लागतील. त्यानंतरच नासाला या प्रकरणात मोहीमेत कितपत यश आले हे कळेल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.