आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.
या फायनलमध्ये भारतीय संघाच्या हातून सामना जवळजवळ निसटला होता. मात्र शेवटी सूर्यकुमार यादवने निर्णायक झेल टिपला आणि भारतीय संघाचा विजय खेचून आणला. हा झेल भारतीय संघासाठी निर्णायक ठरला होता. मात्र या सामन्यानंतर सूर्याच्या झेलवरुन वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. आता दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजाने सूर्याच्या (Suryakumar Yadav) झेलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीने (Tabraiz Shamsi) सूर्यकुमार यादवच्या झेलबाबत बोलताना एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या तुफान चर्चेत आहे. शम्सीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ' जर त्यांनी झेल पकडला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी या टेक्निकचा वापर केला असता तर कदाचित फलंदाज नॉट आऊट राहिला असता.
तबरेज शम्सीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही लोकं लोकल क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्षेत्ररक्षकाने झेल टिपल्यानंतर हा झेल योग्यरित्या पकडला गेला आहे की नाही, हे पडताळून पाहण्यासाठी वेगवेगळ्या अँगलचा वापर केला जात आहे. क्षेत्ररक्षकने ज्या ठिकाणी झेल टिपला, तो त्याच स्थितीत उभा आहे. त्यानंतर सर्व खेळाडू येतात आणि त्याचा पाय बाहेर गेला आहे की नाही हे पाहतात.
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यासाठी १६ धावांची गरज होती. त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता.
तर हार्दिक पंड्या शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. पहिलाच चेंडू हार्दिकने फुलटॉस टाकला या चेंडुवर मिलरने मोठा फटका मारला. नेमका त्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवने निर्णायक झेल टिपला आणि भारतीय संघाचा विजय निश्चित झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.