south africa cricket team twitter
क्रीडा

South Africa: लागोपाठ 6 सामने जिंकूनही दक्षिण आफ्रिकेवर टांगती तलवार! सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. एडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र अजूनही या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळालेलं नाही. दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी कसं असेल सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ४५ व्या सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकअखेर ६ गडी बाद १६३ धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने ३८ चेंडूंचा सामना करत ६५ धावांची खेळी केली. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १६३ धावा करायच्या होत्या. मात्र इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेने १५६ धावांवर रोखलं. यासह हा सामना ७ धावांनी आपल्या नावावर केला. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ २ पैकी २ सामने जिंकून अव्वल स्थानी आहे. मात्र अजूनही दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला नाही.

कसं असेल समीकरण

समीकरण जाणून घेण्याआधी, कोणता संघ कितव्या स्थानी आहे हे जाणून घ्या. दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, इंग्लंड आणि अमेरिका या चारही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी २-२ सामने खेळले आहेत. ४ गुणांसह (नेट रनरेट +०.६२५) अव्वल स्थानी आहे. तर वेस्टइंडिजचा संघ २ पैकी १ सामना जिंकून २ गुणांसह (नेट रनरेट +१.८१४) इंग्लंडचा संघ २ गुणांसह (+ ०.४१२) तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेने २ सामने खेळले आहेत आणि हे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे अमरिकेचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत साखळी फेरी आणि सुपर ८ फेरीत ६ सामने खेळले आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. इंग्लंडचा पुढील सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात जर इंग्लंडने विजय मिळवला. तर वेस्टइंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा दोन्ही संघांसाठी करो या मरो सामना असेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे ६ पैकी ६ सामने जिंकूनही दक्षिण आफ्रिकेवर टांगती तलवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ताजमहालाच्या तळाशी आहेत 50 विहिरी, तुम्हाला माहितीये यामागील रहस्य!

VIDEO : थेट घरात घुसून महिलेवर अत्त्याचार; सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा धाक संपला?

उपमुख्यमंत्र्याच्या पोरानं कायदा मोडला; RTO ने पकडला, ७ हजारांना भुर्दंड!

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT