South Africa vs Bangladesh Playing 11 And Match Prediction saam tv news
क्रीडा

SA vs BAN: बांगलादेश- दक्षिण आफ्रिका सामन्यात २ धडाकेबाज खेळाडूंचं होणार पुनरागमन; अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

South Africa vs Bangladesh Playing 11 And Match Prediction: या सामन्यात असी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Ankush Dhavre

South Africa vs Bangladesh Playing 11 And Match Prediction:

मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गेल्या सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात बांगलादेशला पराभूत करून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर बांगलादेशचा संघ हा सामना जिंकून स्पर्धेतील आपलं आव्हान आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या वानखेडेवरी खेळपट्टी कोणासाठी फायदेशीर ठरेल.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

खेळपट्टी कोणासाठी ठरेल फायदेशीर?

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी ही फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातो हे आपण गेल्या सामन्यातही पाहिलं.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यासाठी दोन्ही संघातील कर्णधार कमबॅक करताना दिसून येऊ शकतात. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावूमा हे दोघेही दुखापतीमुळे गेल्या सामन्यात खेळताना दिसून आले नव्हते. (Latest sports updates)

वानखेडेच्या मैदानावर आतापर्यंत एकुण ३९ वनडे सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान १५ सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. तर १५ सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

मात्र या मैदानावर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघांना दवाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:

टेम्बा बावूमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रासी वान डर डुसेन, एडेन मार्करम, हेनरीक क्लासेन, डेव्हिड वॉर्नर, मार्को यान्सेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, गेराल्ड कोएत्जी, लुंगी एन्गिडी

या सामन्यासाठी अशी असू शकते बांगलादेशची प्लेइंग ११:

तंजिद हसन,लिटन दास, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुश्फिकुर रहिम (यष्टीरक्षक), तौहीद ह्रदोय, महमदुल्लाह, नसुम अहमद, तंजीम साकिब,मुस्तफिजुर रहमान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

SCROLL FOR NEXT