Viral Video: झुमे जो पठाण! पाकिस्तानच्या पराभवानंतर इरफान- राशिदचा भन्नाट डान्स! भांगडा केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Irfan Pathan Rashid Khan Dance Video: पाकिस्तान- अफगाणिस्तान सामन्यानंतर इरफान पठाण आणि राशिद खान डान्स करताना दिसून आले आहेत .
irfan pathan
irfan pathantwitter
Published On

Irfan Pathan Rashid Khan Dance Video:

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला. हा अफगाणिस्तानचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. तर पाकिस्तानविरूद्ध खेळताना हा वनडेतील पहिलाच विजय ठरला आहे.

दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तान संघातील खेळाडू मैदानावर जल्लोष साजरा करताना दिसून आले. भारताचा माजी खेळाडू इरफान पठान देखील डान्स करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठान वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत हिंदी समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसून येतोय. समालोचन करत असताना तो क्रिकेट फॅन्सचं मनोरंजन करताना दिसून येत असतो. नुकताच तो अफगाणिस्तान संघासोबत मैदानावर येऊन भांगडा नृत्य करताना दिसून आला आहे.

या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानावर जल्लोष साजरा करताना दिसून आले. राशिद खानसह सर्व खेळाडू अफगाणिस्तानला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या क्रिकेट फॅन्सचं आभार मानताना दिसून आले. त्यावेळी इरफान पठाण आणि जतिन सप्रु चर्चा करत होते.

राशिद खानला पाहताच इरफान पठाण त्याचं अभिनंदन करतो आणि डान्स करू लागतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, 'मी माझं वचन पूर्ण केलं. राशिदने मला म्हटलं होतं की आम्ही पुन्हा जिंकणार.मी ही त्याला म्हटलं होतं की मी पुन्हा नृत्य करेल.' (Latest sports updates)

irfan pathan
PAK vs AFG: पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं? वाचा सविस्तर

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना बाबर आझमने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर पाकिस्तानने ७ गडी बाद २८२ धावा केल्या तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून इब्राहिम जाद्रानने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर रहमत शाहने नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

irfan pathan
Babar Azam Statement: अफगाणिस्तानविरूद्धच्या दारूण पराभवानंतर बाबर आझम भडकला! या खेळाडूंना ठरवलं जबाबदार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com