Babar Azam Statement: अफगाणिस्तानविरूद्धच्या दारूण पराभवानंतर बाबर आझम भडकला! या खेळाडूंना ठरवलं जबाबदार

Pakistan vs Afghanistan: या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठं वक्तव्य केलं आहे.
babar azam
babar azamtwitter

Pakistan vs Afghanistan, Babar Azam Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत अफगाणिस्तानने दुसरा मोठा उलटफेर केला आहे. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानला विजयासाठी २८३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अफगानिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या पराभवानंतर बाबर आझमने मोठं वक्तव्य केलं आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यानंतर बोलताना बाबर आझम म्हणाला की, ' जर तुम्ही एका क्षेत्रात चांगली कामगिरी करत नाही तर सामना गमावण्याची पुरेपूर शक्यता असते. अफगाणिस्तानचे फलंदाज आमच्या गोलंदाजांविरुद्ध सहज धावा काढत राहिले आणि चौकार मारत राहिले. ज्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले आहेत.आमच्या गोलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली. मात्र मधल्या षटकांमध्ये नियंत्रित गोलंदाजी करता आली नाही. या षटकांमध्ये गोलंदाज विकेट्स काढू शकले नाही. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली यात काहीच शंका नाही.'

babar azam
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

तसेच तो पुढे म्हणाला की,'अफगाणिस्तानने आम्हाला तिन्ही क्षेत्रात मागे सोडलं. त्यामुळे ते विजयाचे खरे हकदार आहेत. आमचा संघ चांगला खेळ करू शकत नाहीये. मुख्यत: गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. मात्र येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्त करू. आम्ही खेळपट्टीनूसार योग्य लाईन लेंथवर गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे आम्हाला अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर दबाव बनवता आला नाही.' (Latest sports updates)

babar azam
PAK vs AFG: पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं? वाचा सविस्तर

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद २८२ धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून इब्राहिम जाद्रानने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर रहमत शाहने नाबाद ७७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com