South africa squad announced for upcoming icc t20 world cup 2024 aiden markram named as captain amd2000 saam tv
Sports

South Africa Squad: T20 WC 2024 साठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा! IPL गाजवणाऱ्या या खेळाडूंना मिळालं स्थान

T20 World Cup 2024, South Africa Squad: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिलं गेलं आहे.

Ankush Dhavre

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची धुरा एडन मार्करमच्या हाती सोपवण्यात आली आहे. एडन मार्करम सध्या आयपीएल २०२४ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करतोय. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघासह २ राखीव खेळाडूंची देखील नावं समोर आली आहेत.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने देखील आयपीएल २०२४ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे संघाची निवड केल्याचं चित्र दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून शानदार कामगिरी करणाऱ्या गेराल्ड कोएत्जीला या संघात स्थान देण्यात आलं आहे. गेराल्ज कोएत्जीला आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी देखील त्याचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश करण्यात आला होता. त्यावेळीही त्याने शानदार कामगिरी केली होती.

या संघात फलंदाज म्हणून क्विंटन डीकॉक, ओटनील बार्टमन, ब्योर्न फोटूइ, डेव्हिड मिलर आणि रिझा हेंड्रिक्ससारख्या विस्फोटक फलंदाजांना संधी दिली गेली आहे. तर एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्ज या गोलंदाजांना संघात दिलं गेलं आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ :

एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, ॲनरिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज, केशव महाराज, डेव्हिड मिलर.

राखीव खेळाडू – नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT