south africa cricket team google
Sports

South Africa Cricket: कसोटी क्रिकेटचा अंत निश्चित? द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या या धक्कादायक निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ

T20 League Effects On T20 Cricket: दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने धक्कादायक निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

T20 Effect On Test Cricket:

नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पाडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने जोरदार विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत मालिका १-१ ने ड्रॉ केली.

या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने धक्कादायक निर्णय घेतला आहे.

कसोटी क्रिकेटचा अंत निश्चित?

न्यूझीलंडचा संघ आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघ आहे. या मजबूत संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका ७ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान खेळली जाणार आहे.

या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ६ अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर जोरदार टिका केली जात आहे. (Latest sports updates)

का होतेय टिका?

एकीकडे आयसीसीकडून कसोटी क्रिकेट जिंवत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असताना, दक्षिण आफ्रिका बोर्डाने टी-२० क्रिकेटला प्राधान्य दिलं आहे. संघातील प्रमुख खेळाडू देशातील टी-२० लीग क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेने घेतलेला हा निर्णय कसोटी क्रिकेटसाठी धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. जर भविष्यात सर्व संघांनी असे निर्णय घेतले तर कसोटी क्रिकेटला पूर्णविराम लागायला वेळ लागणार नाही.

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत नील ब्रांड संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर ७ नवख्या खेळाडूंना या संघात स्थान दिलं गेलं आहे. डेव्हिड बेडिंघम, जुबैर हमजा आणि कीगन पीटरसन यांना वगळलं तर उर्वरीत सर्व खेळाडू नवीन आहेत.

ज्यावेळी ही कसोटी मालिका सुरु असेल त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारासह इतर प्रमुख खेळाडू दक्षिण आफ्रिका टी-२० लीग खेळताना दिसून येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

SCROLL FOR NEXT