T20 World Cup 2024 saam nbws
Sports

T20 World Cup 2024 : डीकॉकची झुंजार खेळी; दक्षिण आफ्रिकेकडून अमेरिका १८ धावांनी पराभूत

South Africa vs United States match : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-८ फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १८ धावांनी अमेरिकेचा धुव्वा उडवला.

Vishal Gangurde

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवर डीकॉक या आक्रमक खेळाडूने ७४ धावांची धमाकेदार खेळी खेळली. तर यावेळी मार्करामने डीकॉकला साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० चेंडूत ११० धांवांची भागिदरी केली होती. याच खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेसमोर मोठी धावसंख्या उभी केली. याच धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेला १७६ धावांवर गुंडाळलं. अमेरिका दक्षिण आफ्रिकेकडून १८ धावांनी पराभूत झाली.

सुरुवातीचे सर्वच सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून २० षटकात १९४ धावा कुटल्या. तर दुसरीकडे पहिल्यांदा स्पर्धेत नॉकआऊट खेळायला उतरलेल्या अमेरिकेने आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. अमेरिकेच्या एंड्रियस गॉस अर्धशतकी खेळी खेळली. गॉसने ४७ चेंडूत ८० धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ २० षटकात १७६ धावा करू शकला. यामुळे अमेरिकेने १८ धावांनी सामना गमावला. दक्षिण आफ्रिकेसाठी रबाडाने १८ धावा देऊन ३ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिका स्पर्धेत सलग पाचवा विजय प्राप्त करण्यास यशस्वी ठरली. तर दक्षिण आफ्रिका २००९ साली झालेल्या टी२० विश्वचषकात सलग पाच सामन्यात विजय मिळवण्यास यशस्वी झाली होती.

'मॅन ऑफ द मॅच' ठरलेल्या डीकॉकने अमेरिकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना ४० चेंडूत सात चौकार आणि पाच छटकार लगावले. तर मार्करमने ३२ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकार लगावत ४६ धावा कुटल्या. क्लासेनने नाबाद ३६ धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद २० धावा केल्या. क्सासेन आणि ट्रिस्टन स्टब्सने पाचव्या गडीसाठी ५३ धावांची भागीदारी केली. अमेरिकेसाठी सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंहने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT