बीसीसीआयच्या निवड समितीकडून आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी १७ खेळाडूंची निवड केली आहे. या संघाची घोषणा केल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
सौरव गांगुलीने सोमवारी आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या संघनिवडीवर मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुली म्हणाला, 'टीम इंडियाकडे चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आशिया कप देखील विश्वचषकासारखी स्पर्धा आहे. केवळ पहिल्या स्थानावर लक्ष केंद्रीत करून चालणार नाही. तसेच निवड समितीने एका चांगल्या खेळाडूला चौथ्या स्थानावर बॅटिंगसाठी उतरवलं पाहिजे'.
गांगुली पुढे म्हणाला, 'भारतीय संघाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. मात्र, आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. फलंदाजीसाठी चौथ्या स्थानावर खेळण्यास राहुल द्रविड, निवड समिती आणि रोहित शर्मा यांनी एका चांगल्या खेळाडूस संधी दिली पाहिजे',
गांगुली पुढे म्हणाला, 'मी एकदिवसीय सामन्यात फलंदाजीसाठी सुरुवातीला मधल्या फळीत सज्ज असायचो. त्यानंतर तत्कालीन कर्णधार सचिन तेंडुलकरच्या म्हणण्यानुसार डावाची सुरुवात करू लागलो'.
'सचिन तेंडुलकर देखील सुरुवातीला सहाव्या क्रमांकावर खेळायचा. त्यामुळे चौथ्या क्रमाकांवर कोणीही खेळू शकतो. संघात विराट कोहली , श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारखे खेळाडू आहेत, असेही तो म्हणाला.
दरम्यान, आशिया चषकाच्या स्पर्धेसाठी संघात युझवेंद्र चहलला स्थान दिलं नाही. त्यावरही गांगुलीने भाष्य केलं. 'मला कळालं नाही की, निवड समितीने चहलला संघात का स्थान दिलं गेलं नाही', असं गांगुली म्हणाला.
आशिया चषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव)
असे आहे वेळापत्रक
आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर
सुपर-४ सामने
अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर
ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर
अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर
अ २ विरुद्ध ब १ - १२ सप्टेंबर
अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर
अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर
अंतिम - १७ सप्टेंबर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.