Night Leg Pain : फक्त रात्रीच पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका, 'ही' असू शकतात ३ गंभीर कारणं

Shreya Maskar

रात्री

काही जणांचे पाय रात्री खूप दुखतात. पायांच्या पोटऱ्यांमध्ये कळा येतात, तर काहींना पायांमध्ये मुंग्या येणे, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते. त्यामुळे झोपमोड होते.

night | pinterest

स्नायूंमध्ये अचानक कळ येणे

रात्री पाय दुखण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे स्नायूंमध्ये अचानक येणाऱ्या कळा (Leg Cramps). विशेषतः पोटरीच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात.

Sudden muscle spasms | pinterest

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

दिवसभर जास्त चालणे किंवा उभे राहणे. स्नायूंवर अतिताण येणे. शरीरात पाण्याची कमतरता असणे. काही औषधांचे दुष्परिणाम यांमुळे ही समस्या उद्भवते.

taken care | pinterest

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम

रात्री पायांमध्ये वेदना, मुंग्या, खाजल्यासारखे किंवा काहीतरी रेंगाळत असल्यासारखे वाटत असेल, तर त्यामागे रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (RLS) असू शकतो.

Restless legs syndrome | pinterest

पायांची हालचाल

RLS स्थितीत व्यक्तीला पाय सतत हलवण्याची तीव्र इच्छा होते. विशेषतः रात्री आराम करताना किंवा झोपण्याचा प्रयत्न करताना हा त्रास वाढतो. पाय हलवल्यानंतर काही प्रमाणात आराम मिळतो.

Leg movement | pinterest

मज्जातंतूची समस्या

रात्री पायांमध्ये जळजळ, मुंग्या, बधिरपणा किंवा टोचल्यासारख्या वेदना होत असतील, तर मज्जातंतूंशी संबंधित समस्या असू शकते.

Nerve problem | pinterest

रक्ताभिसरणाची समस्या

काही वेळा पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळेही वेदना होऊ शकतात. विशेषतः चालताना किंवा व्यायाम करताना पोटरी दुखणे आणि विश्रांती घेतल्यानंतरही वेदना कायम राहणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.

Circulation problems | pinterest

उपाय काय?

दिवसभर पुरेसे पाणी प्या. झोपण्यापूर्वी पायांचे हलके स्ट्रेचिंग करा. नियमित चालणे आणि हलका व्यायाम करा. जास्त वेळ एकाच जागी बसणे किंवा उभे राहणे टाळा.

What is the solution? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | google

NEXT : रोज १ आवळा खाल्ल्याने 'हे' ५ आजार होतील बरे, त्यातील एक आहे लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण

Amla Juice Benefits For Long Hair
येथे क्लिक करा...