
सर विवियन रिचर्ड्स, हे नाव ऐकलं तरी गोलंदाज थरथर कापायाचे. कारण हा फलंदाज शॉट असा मारायचा जणू AK47 ची गोळी आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत या फलंदाजाने वेस्टइंडीजला अनेकदा विजय मिळवून दिला आहे.
क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या या फलंदाजाचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. परिस्थिती हालाखीची असल्याने १८ व्या वर्षी विवियन रिचर्ड्सला हॉटेलमध्ये काम करावं लागलं होतं.
इतरांप्रमाणे विवियन रिचर्ड्स यांना देखील लहानपणापासून क्रिकेट खेळायला आवडायचं. डॉनल्ड आणि मर्विन ही विवियन रिचर्ड्स यांची भावंडं आहेत. त्यांच्यासोबतच विवियन रिचर्ड्स सराव करायचे.
ज्या वयात शिक्षण करून पुढे जायचं होतं, त्याच वयात विवियन रिचर्ड्स यांना शाळा सोडून हॉटेलमध्ये काम करावं लागलं होतं. मात्र आपलं नशीब कशी बदलेल हे कोणालाच माहित नसतं. असच काही विवियन रिचर्ड्ससोबत देखील घडलं.
ज्या हॉटेलमध्ये ते काम करायचे त्या हॉटेलच्या मालकाला माहीत होतं की, विवियन रिचर्ड्स उत्तम क्रिकेट खेळतो. त्यांचा खेळ पाहून हॉटेल मालकाने वयाच्या १८ व्या वर्षी क्रिकेट किट गिफ्ट केली होती.
किट मिळाल्यानंतर त्यांनी पुढील प्रशिक्षणासाठी सेंट जॉन्स क्रिकेट क्लब जॉईन केला. जोरदार सराव आणि तुफान फटकेबाजीच्या बळावर त्यांनी ३ वर्षानंतर वेस्टइंडीज संघासाठी पदार्पण केलं. (Latest sports updates)
विवियन रिचर्ड्स यांना आपल्या कारकिर्दीची सुरुवात हवी तशी करता आली नव्हती. १९७४ मध्ये २६१, १९७५ मध्ये २६१ धावा केल्या होत्या. २ वर्ष सुमार कामगिरी केल्यानंतर तिसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विवियन रिचर्ड्स नावाचं वादळ आलं. १९७६ मध्ये त्यांनी १७१० धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान त्यांनी ७ शतक झळकावली होती. आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत त्यांनी ८५४० धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.