Sourav Ganguly Car Accident 
Sports

Sourav Ganguly Car Accident : सौरव गांगुलीच्या कारचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला दादा

Sourav Ganguly Car Accident : सौरव गांगुलीच्या कारचा भीषण अपघात झालाय. कारने ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला. यामध्ये गांगुली थोडक्यात बचावला.

Namdeo Kumbhar

Sourav Ganguly Car Accident : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामधून दादा थोडक्यात बचावला आहे. दुर्गापुर एक्सप्रेस वे वर कारने ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. सौरव गांगुली याला कोणतीही जखम झाली नाही.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली एका कार्यक्रमात जाण्यासाठी बर्दावानकडे निघाला होता. त्यावेळी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर एक ट्रक त्यांच्या कारच्या समोर आली. त्यामुळे चालकाचे संतुलन बिघडले. पण चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावले. मागील कारनेही ब्रेक लागवले, त्यामुळे सर्व कर एकमेंकाना जोरदार धडकल्या. या भीषण अपघातामध्ये कारचे मोठं नुकसान झालं.

या भीषण अपघातात सौरव गांगुलीच्या सोबत असणाऱ्या एकाही व्यक्तीला दुखपत झाली नाही. पण अपघातानंतर सौरव गांगुलाला दहा ते १५ मिनिटे थांबावे लागले. सौरव गांगुलीच्या ताफ्यामधील दोन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. दुर्घटना झाली, त्या ठिकाणी थोडावेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. दहा ते १५ मिनिटांनंतर सौरव गांगुली बर्दवान विद्यापीठातील कार्यक्रमासाठी निघून गेला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार पेक्षा जास्त धावा

सौरव गांगुली हा भारताच्या यशस्वी कर्णधारामध्ये येतो. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने विदेशातही विजय मिळवण्यास सुरूवात केली होती. सौरव गांगुली याने वनडे क्रिकेटमध्ये ११३६३ धावांचा पाऊस पाडलाय. गांगुलीने वनडेमध्ये ५२ अर्धशतके आणि २२ शतके ठोकली आहेत. कसोटीमध्येही दादाने धावांचा पाऊस पाडला आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००२ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला होता. तर २००३ वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली होती. सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Karlyache Kaap: कारल्याची कडू भाजी सोडा, बनवा कुरकुरीत काप; सोपी रेसिपी करा ट्राय

Operation Cy-Hunt : 'ऑपरेशन साय-हंट'! एकाच दिवशी २६३ गुन्हेगारांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Jio-Airtel लांब, आता BSNL ची एन्ट्री! मुंबई मेट्रो ३ मध्ये मोबाईल नेटवर्कची अडचण सुटणार का?

Trendy Blouse Designs For Bride: यंदा कर्तव्य आहे? मग 'या' ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्समध्ये तुमचा ब्राइडल लुक करा खास

SCROLL FOR NEXT