World Cup 2023, Playing XI saam tv
क्रीडा

World Cup 2023, Playing XI: वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलींनी निवडली टीम इंडियाची प्लेइंग ११; विराटच्या खास भिडूला ठेवलं संघाबाहेर

Ankush Dhavre

Sourav Ganguly Named Team India's Playing 11 For World Cup:

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेला येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा भारतात रंगणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

मात्र भारतीय संघ कुठल्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी आगमी वर्ल्डकप स्पर्धेसाठी १७ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे.

या खेळाडूंना दिलं स्थान...

सौरव गांगुली यांनी आपल्या प्लेइंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि आक्रमक फलंदाज शुभमन गिलला स्थान दिलं आहे. तर नंबर ३ वर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी ईशान किशनला संघात स्थान दिलं आहे.

तर विराट कोहलीला चौथ्या स्थानी ठेवलं आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी श्रेयस अय्यरची निवड केली आहे. तसेच सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी केएल राहुलला संघात स्थान दिले आहे.

यासह त्यांनी आपल्या संघात २ यष्टिरक्षक फलंदाजांना स्थान दिले आहे. या संघात त्यांनी केएल राहुलला देखील स्थान दिलं आहे. (Latest sports updates)

या अष्टपैलू खेळाडूंना दिलं स्थान..

सौरव गांगुली यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि पटेलची निवड केली आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी कुलदीप यादवला संघात स्थान दिलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीची निवड केली आहे.

असा आहे सौरव गांगुली यांनी निवडलेला १७ सदस्यीय भारतीय संघ...

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT