Asia Cup 2023: विराटच्या 'त्या' कृत्यामुळे BCCI नाराज! एका चुकीमुळे संपूर्ण संघाला दिली वॉर्निंग

Virat Kohli YO-YO Test Score : त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण संघाला चेतावणी दिली गेली आहे.
virat kohli
virat kohli saam tv
Published On

BCCI Warned Virat Kohli:

आशिया चषकापूर्वी भारतीय खेळाडूंची यो-यो टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली पास झाला आहे.

मात्र आपला टेस्ट स्कोर सोशल मीडियावर शेअर करणं त्याला महागात पडलं आहे. त्याच्या या चुकीमुळे संपूर्ण संघाला चेतावणी दिली गेली आहे.

virat kohli
Asia Cup 2023: टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी! संघात निवड होऊनही 'या' खेळाडूला काही सामने राहावं लागेल संघाबाहेर

आशिया चषक सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे सराव शिबिर कर्नाटकच्या अलुरमध्ये सुरू आहे. या सराव शिबिरादरम्यान खेळाडूंची यो-यो टेस्ट करण्यात आली.

विराटने यो-यो टेस्टमध्ये १७.२ गुणांची कमाई केली . हा स्कोर त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्याच्या या कृत्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना ताकीद केले आहे.

यो-यो टेस्टचा स्कोर सार्वजानिकरित्या सोशल मीडियावर शेअर करणं हे करारातील नियमांच उल्लंघन असल्याचही बीसीसीआयने म्हटले आहे. (Latest sports updates)

virat kohli
Asia Cup 2023: यो-यो टेस्टमध्ये रोहित शर्मा नापास? नेटकऱ्यांनी केली LIVE चाचणी करण्याची मागणी

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानूसार, विराट कोहलीने यो-यो टेस्टचा स्कोर शेअर केल्यानंतर बीसीसीआयने इतर खेळाडूंना यो-यो टेस्टचा स्कोर सार्वजानिकरित्या शेअर करू नका, असं बजावून सांगितलं आहे.

आशिया चषकापूर्वी सुरू असलेल्या सराव शिबिरात गुरूवारी (२४ ऑगस्ट) भारतीय खेळाडूंनी मैदानात उतरून फिटनेस ड्रिल्स केल्या.

ज्यात यो-यो टेस्टचा देखील समावेश होता. विराटने यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक १७.२ गुंणाची कमाई केली. सध्या बीसीसीआयने १६.५ इतका फिटनेस पॅरामीटर सेट केला आहे.

या खेळाडूंना यो-यो टेस्ट देण्याची गरज नाही...

जे खेळाडू आयर्लंड दौऱ्यावर नव्हते त्या खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली आहे. या कारणास्तव जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसनची यो-यो टेस्ट केली जाणार नाही.

आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या संघातील ३ खेळाडूंची आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा यांचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसनची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com