sourav ganguly saam tv
Sports

Sourav Ganguly On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद देण्यावरून सौरव गांगुली भडकले; BCCI ला जाब विचारत म्हणाले...

Sourav Ganguly On Team India Captaincy: या निर्णयावरून माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Team India News: भारतीय संघ येत्या काही दिवसात वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अजिंक्य रहाणेची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या निर्णयावरून माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.

रहाणेला उपकर्णधारपद दिल्याने सौरव गांगुली भडकले..

अजिंक्य रहाणे हा गेल्या दिड वर्षांपासून संघाबाहेर होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करून त्याने भारतीय संघात कमबॅक केलं आहे. नुकताच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्याची निवड केली गेली होती.

ज्यावेळी अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं होतं त्यावेळी सौरव गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. याबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, 'तुम्ही १८ महिने संघाबाहेर असता त्यानंतर एक कसोटी सामना खेळता. त्यानंतर तुम्हाला संघाचं उपकर्णधारपद दिलं जातं. मला या निर्णयामागचं कारण कळू शकलं नाहीये. भारतीय संघाकडे रविंद्र जडेजाचा पर्याय उपलब्ध होता. तो बऱ्याच वर्षांपासून संघाचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र पुनरागमानंतर लगेचच उपकर्णधारपद देणं माझ्या समजण्या पलीकडचं आहे. (Latest sports updates)

वेस्ट इंडिजविरुद्व होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर करण्यात आलं आहे. १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला अचानक संघाबाहेर करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, 'निवडकर्त्यांनी चेतेश्वर पुजारासोबत स्पष्ट संवाद साधायला हवा. त्यांनी त्याला स्पष्ट करावं की, तो संघात फिट बसतोय का? की बीसीसीआय आता युवा खेळाडूंसह पुढे जाण्याच्या विचारात आहे. पुजारा सारख्या फलंदाजाला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकत नाही. आधी तुम्ही निवड करता मग बाहेर करता मग परत निवड करता आणि परत बाहेर करता. अजिंक्य रहाणेसोबत देखील हेच झालं आहे.'

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्य संघात पुन्हा एकदा सरफराज खानला दुर्लक्षित केलं गेलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'सरफराज खानला स्वतःला सिद्द करायची संधी मिळायला हवी. तो आयपील स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरला. तर यशस्वी जयस्वालने रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. मला सरफराज खानबद्दल खूप वाईट वाटतंय. त्याला धावा करण्याची संधी मिळायला हवी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT