smriti mandhana twitter
Sports

Smriti Mandhana Record: लागोपाठ शतकांसह स्म्रिती मंधानाने रचला इतिहास! हा रेकॉर्ड करणारी पहिलीच भारतीय क्रिकेटपटू

IND-W vs SA-W, Smriti Mandhana Record News: भारतीय संघातील फलंदाज स्म्रिती मंधानाने सलग २ शतकांसह इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

दक्षिण आफ्रिका महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघावर ४ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

दरम्यान सामन्यात या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या स्म्रिती मंधानाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तिने मोठ्या रेकॉर्डमध्ये माजी भारतीय खेळाडू मिताली राजची बरोबरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात स्म्रिती मंधानाने शानदार फलंदाजी केली. सलामीला फलंदाजीला येत तिने भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. तिने १०३ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान तिने १ षटकार आणि १२ चौकार मारले. या मालिकेत तिच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे.

हे तिचं या मालिकेतील सलग दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात तिने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. यासह ती वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सलग २ शतकं झळकावणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी कुठल्याच महिला क्रिकेटपटूला असा कारनामा करता आला नव्हता.

मिताली राजच्या रेकॉर्डची बरोबरी

यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा मिताली राजच्या नावावर होता. तिच्या नावे ७ शतकं झळकावण्याची नोंद होती. हा कारनामा तिने २११ इनिंगमध्ये केला होता. आता स्म्रिती मंधानाने देखील ७ वे शतक झळकावत मिताली राजच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तिने हा कारनामा ८४ व्या इनिंगमध्ये करुन दाखवला आहे.

हे आहेत भारतीय महिला संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज

स्म्रिती मंधाना - ७ शतक*

मिताली राज- ७ शतक

हरमनप्रीत कौर- ५ शतक

पूनम राऊत - ३ शतक

भारतीय संघाचा शानदार विजय

या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकअखेर ३ गडी बाद ३२५ धावांची भलामोठा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना स्म्रिती मंधानाने १३६ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने नाबाद १०३ धावांची खेळी केली. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉलवार्टने नाबाद १३५ धावांची खेळी केली. तर मरिजेन कॅपने ११४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने तोडीस तोड टक्कर दिली. मात्र विजयापासून हा संघ ४ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT