Sri lanka vs New Zealand: भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-० ने धूळ चारणारा न्यूझीलंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना १७ नोव्हेंबरला पार पडला.
या सामन्यात श्रीलंकेने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्या गोलंदाजी आणि फलंदाजीतही श्रीलंकेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पावसामुळे हा सामना ४७ षटकांचा खेळवण्यात आला होता. मात्र श्रीलंकेने हा सामना जिंकत तब्बल १२ वर्षांनतर न्यूझीलंडला वनडे मालिकेत पराभूत केलंय.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी करताना विल यंगने २६ धावांची खेळी केली. त्यानंतर रॉबिन्सन ४ धावांवर परतला.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला चॅपमनने न्यूझीलंडसाठी महत्वाची खेळी केली. त्याने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ७६ धावांची खेळी केली. तर मिचने ६२ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडला २०९ धावांपर्यंत मजल मारता आली.
श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, सलामीला आलेल्या पथुम निसंकाने २८ धावांची खेळी केली. कुसल मेंडिसने १०२ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची खेळी केली.
यासह चरीथ असलंकाने १२ धावा केल्या. श्रीलंकेने हे आव्हान ३ गडी राखून पूर्ण केले. हा श्रीलंकेचा या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला आहे. या विजयासह श्रीलंकेने ही मालिका २-० ने आपल्या नावावर केली आहे. मालिकेतील तिसरा सामना जिंकून श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडचा व्हॉईटवॉश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या सामन्यात गोलंदाजी करताना,न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलने १० षटकात ३६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना, महिश थीक्षणाने ९.१ षटकात ३१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.