avishka fernando kusal mendis twitter
क्रीडा

SL vs NZ: मेंडिस-फर्नांडोने न्यूझीलंडची बँड वाजवली! मोडून काढला सर्वात मोठा रेकॉर्ड

SL vs NZ 1st ODI, Avishka Fernando Kusal Mendis Record: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात मेंडिस- फर्नांडो जोडीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-० ने धूळ चारल्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय श्रीलंकेच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी रेकॉर्डब्रेक फलंदाजी केली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला या डावात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. संघातील युवा फलंदाज पथुम निसंका अवघ्या १२ धावांवर माघारी परतला. सुरुवातीला मोठा धक्का बसल्यानंतर कुसल मेंडिस आणि अविष्का फर्नांडो यांनी डाव सांभाळून संघाच्या धावांचा गाडा पुढे नेला.

संघ अडचणीत असताना या दोन्ही फलंदाजांनी मिळून २०६ धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिसने १४३ धावांची खेळी केली. तर अविष्काने १०० धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये संघासाठी दमदार कामगिरी केली आहे.

दिग्गज फलंदाजांची केली बरोबरी

या दोन्ही फलंदाजांनी शतकी खेळी करत दिग्गज फलंदाजांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. वनडे क्रिकेटमध्ये केवळ दुसऱ्यांदा असं घडलंय जेव्हा वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या २ फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. यापूर्वी २००१ मध्ये महेला जयवर्धने आणि सनाथ जयसूर्या यांनी हा कारनामा केला होता. जयसूर्याने १०७ तर जयवर्धनेने ११६ धावांची शानदार शतकी खेळी केली होती.

कुसल मेंडींच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

कुसल मेंडिसने या डावात फलंदाजी करताना १४३ धावांची खेळी केली. यासह तो श्रीलंकेसाठी सर्वात मोठी खेळी करणारा दुसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये कुमार संगकाराने १६९ धावांची खेळी केली होती. ही श्रीलंकेच्या यष्टीरक्षक फलंदाजाने वनडेत केलेली सर्वात मोठी खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT