रविवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नईने मुंबईचा ४ विकेट्सने पराभव केला. मुंबई इंडियन्स स्काउटिंगच्या माध्यमातून आयपीएलमध्ये अनेक स्टार खेळाडूंना लाँच करण्यासाठी ओळखले जातात. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या ही नावं याची मोठी उदाहरणं आहेत. आता आयपीएल २०२५ च्या माध्यमातून मुंबईने एक नवीन हिरा लाँच केल्याचं बोललं जातंय.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात टीमने केरळचा स्पिनर गोलंदाज विघ्नेश पुथूर याला डेब्यू करण्याची संधी दिली. हा खेळाडू डावखुरा स्पिनर गोलंदाज आहे. आतापर्यंत पुथूर केरळकडून देशांतर्गत क्रिकेट खेळू शकलेला नाही. मात्र त्याने आयपीएलमध्ये मुंबईकडून डेब्यू केलं आहे. त्याला आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबईने ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर घेतलंय.
२३ वर्षीय पुथूर हा केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील सुनील कुमार रिक्षा चालक आहेत तर आई केपी बिंदू या गृहिणी आहेत. विघ्नेश त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मध्यमगती गोलंदाज होता. पण स्थानिक क्रिकेटपटू मोहम्मद शरीफने त्याला लेग स्पिन गोलंदाजी करण्यास सांगितलं. यानंतर तो त्रिशूरला गेला आणि तिथून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळाली.
केरळमध्ये विघ्नेश कॉलेज प्रीमियर टी२० लीगमध्ये सेंट थॉमस कॉलेजकडून खेळला. यानंतर, त्याची केरळ क्रिकेट क्लबमधील अॅलेप्पी रिपल्स टीममध्ये निवड झाली. या टीमचं नेतृत्व मोहम्मद अझरुद्दीन यांनी केलं होतं. त्याला अॅलेप्पीकडून तीन सामने खेळावे लागले आणि त्यामध्ये त्याने दोन विकेट्स देखील घेतल्या. विघ्नेश केरळकडून फक्त १४ आणि १९ वर्षांखालील टीममध्ये खेळला आहे. तो तमिळनाडू प्रीमियर लीगचाही भाग होता.
विघ्नेश सध्या पीटीएम सरकारी महाविद्यालयातून साहित्यात एमए करतोय. क्रिकेटसोबतच तो त्याच्या अभ्यासावरही भर देतोय. आयपीएल लिलावात मुंबईने निवडल्याबद्दल एका वेबसाईटशी बोलताना तो म्हणाला, 'मी घरी बसून ऑक्शन पाहत होतो. मला मेगा ऑक्शनमध्ये घेण्याची अपेक्षा नव्हती. आयपीएलमध्ये खेळणं हे माझे स्वप्न होतं. रोहित आणि हार्दिक हे नेहमीच एमआय टीममधील माझे आवडते खेळाडू आहेत. या सुपरस्टार्ससोबत खेळायला मला खूप आनंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.