Womens team india for World Cup 2025 saam tv
Sports

World Cup 2025 : वर्ल्डकपसाठी ६ संघ थेट क्वालिफाय, टीम इंडियाचं काय झालं? संपूर्ण यादी बघा

2025 Women's Cricket World Cup : 2025 मध्ये होणाऱ्या महिला वर्ल्डकप स्पर्धेसाठी सहा संघ थेट पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघांचा निर्णय वर्ल्डकप स्पर्धेतील पात्रता फेरीत होणार आहे.

Nandkumar Joshi

वेस्टइंडीज विरुद्ध बांगलादेश संघाचा पराभव झाल्यानंतर 'आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५' स्पर्धेत पहिले ६ संघ कोणते पात्र ठरलेत याचं चित्र स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन संघांच्या सहभागाबद्दलचा निर्णय स्पर्धेतील पात्रता फेरीद्वारे होणार आहे. न्यूझीलंड हा या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणारा अखेरचा संघ ठरला आहे.

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धा २०२५ मध्ये भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी आठ संघ पात्र ठरणार आहेत. त्यातील सहा संघांनी या स्पर्धेत थेट एन्ट्री केली आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध नुकत्याच झालेल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव झाला. त्यानंतर थेट पात्र ठरणारे सहा संघ कोणते याबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन संघ कोणते असतील याचा निकाल पात्रता फेरीद्वारे लागेल.

वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडं आहे. त्यामुळं भारतीय महिला क्रिकेट संघाला थेट एन्ट्री मिळाली आहे. तर अन्य पाच संघांना चॅम्पियनशिपद्वारे थेट पात्र होता आलं. या पाच संघांमध्ये न्यूझीलंड व्यतिरिक्त गतविजेते चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या चार संघांचा समावेश आहे.

महिला चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन संघांचे गुण समान होते. मात्र, सामने जास्त जिंकल्याने न्यूझीलंड संघाला वर्ल्डकप स्पर्धेचं थेट तिकीट मिळालं आहे. ऑस्ट्रेलियानं ३९ गुणांसह महिला चॅम्पियनशिप जिंकली आहे. तर भारत ३७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ ३२ गुणांसह तिसऱ्या स्थानी, दक्षिण आफ्रिका २५ गुणांसह चौथ्या, श्रीलंका २२ गुणांसह पाचव्या आणि न्यूझीलंड २१ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. या सहा संघांनी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत थेट एन्ट्री मिळवली आहे.

बांगलादेश संघाचे २१ गुण आहेत. वेस्ट इंडीज १८ गुण, पाकिस्तान १७ गुण, तर आयर्लंड संघाचे ८ गुण आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत एन्ट्री मिळवण्यासाठी या संघांना स्कॉटलँड आणि थायलंड या संघांसोबत वर्ल्डकप स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. वर्ल्डकप पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या या सहा संघांपैकी फक्त दोन संघांनाच सहभागी होता येणार आहे.

भारताची कामगिरी

महिला चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी २४ सामन्यांपैकी १८ सामने जिंकले आहेत. मात्र, त्यांचा एक सामना बांगलादेशविरुद्ध बरोबरीत सुटला. तर पाच सामन्यांत पराभव झाला. त्यामुळं टीम इंडियाच्या खात्यात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेने २ गुण कमी पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT