team india twitter
Sports

IND vs NZ: तिसऱ्या टी-२० साठी भारताच्या प्लेइंग ११ मध्ये होणार मोठे बदल; २ खेळाडूंना मिळणार बाहेरचा रस्ता

India third T20 playing XI: भारत आणि प्रतिस्पर्धी टीम यांच्यातील सिरीजमधील तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-२० सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमध्ये टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतलीये. दरम्यान आता भारताचं तिसरा सामना जिंकून सिरीज जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. तर न्यूझीलंड हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्याच्या प्रयत्नात असेल.

दरम्यान या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहाचं कमबॅक होणार आहे. तर दुसऱ्या सामन्या उत्तम गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादव टीमबाहेर जावं लागू शकतं.

अक्षर पटेलचं होणार कमबॅक?

दुखापतीमुळे उपकर्णधार अक्षर पटेल दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी कुलदीप यादवचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यात कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आणि दोन विकेट्स घेतल्या. मात्र आता टीममध्ये उपकर्णधार परतणार असल्याने त्याला टीमबाहेर जावं लागू शकतं.

जसप्रीत बुमराहचं होणार कमबॅक?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता त्याला तिसऱ्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. दुसऱ्या सामन्यात खेळणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला बुमराहमुळे बाहेर बसावं लागू शकतं.

या दोन प्रमुख बदलांव्यतिरिक्त टीममध्ये कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत. त्यामुळे टीम इंडिया सामना जिंकून आजच सिरीज जिंकणार का हे पाहावं लागणार आहे.

कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

Shivaji Maharaj Indian Navy history: छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हटलं जातं?

Border 2 फेम दिलजीत दोसांझचं स्किन-हेअर रूटीन; पुरुषांनी नक्की करा फॉलो

Shocking: २ बायकांमध्ये नवऱ्याचं विभाजन, एकीसोबत ३ तर दुसरीसोबत ३ दिवस राहणार; रविवारी तरुणाला मिळणार सुट्टी

SCROLL FOR NEXT