Mumbai Indians: सूर्यकुमार यादव,जसप्रीत बुमराह अन् ईशान किशन सोडणार मुंबईची साथ? ऑक्शननंतर समोर आली मोठी अपडेट

Mumbai Indians IPL 2024: आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे
Mumbai indians
Mumbai indiansgoogle
Published On

Mumbai Indians IPL 2024:

आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयाने क्रिकेट फॅन्स नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

फॅन्ससह संघातील खेळाडूही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. दरम्यान आता अशी चर्चा सुरु आहे की, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सला रामराम करु शकतात.

गेली १० वर्ष रोहित शर्मा हा मुंबईचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली. आता कर्णधार पदावरुन अचानका काढल्यानंतर फॅन्स संपापले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोवर्सची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आता सोशल मीडियावर अशी चर्चा रंगलीये की,सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि इशान किशन मुंबई इंडियन्स सोडणार. मात्र मुंबई इंडियन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे की,असं काहीच नसून मुंबईचा कुठलाही खेळाडू संघातून बाहेर पडणार नाही. (Latest sports updates)

Mumbai indians
IND vs SA 3rd ODI: निर्णायक लढत जिंकण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लान! विराटच्या या खास प्लेअरला देणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

या अधिकाऱ्याने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,'या सर्व अफवा असून, कुठलाही खेळाडू मुंबईचा संघ सोडून जाणार नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही सर्व खेळाडूंना विश्वासात घेतलं. रोहितलाही याबाबत कल्पना देण्यात आली होती.'रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकलं असलं तरीदेखील तो फलंदाज म्हणून संघाकडून खेळताना दिसेल, असं मुंबई इंडियन्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई इंडियन्सचा हेड कोच मार्क बाऊचरला जेव्हा रोहितबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की,'मला असं वाटतं की एक बदल होण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुंबई इंडियन्स पुढे जात आहे. रोहित आमच्यासाठी शानदार खेळाडू आहे. तो एक दिग्गज खेळाडू आहे.'

Mumbai indians
Ind vs Sa 3rd ODI, Weather Update: भारत- द.आफ्रिका निर्णायक वनडे सामना रद्द होणार? कसं असेल हवामान?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com