धरमशाला कसोटीचा पहिला दिवस (IND vs ENG) भारतीय गोलंदाजांनी गाजवला. तर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा जलवा सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केल्यानंतर शुभमन गिलनेही (Shubman Gill) आपलं शतक पूर्ण केलं. गिल या डावात १५० चेंडूत १०३ धावांची खेळी करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने एक क्लासिक षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जेम्स अँडरसन (James Anderson) हा आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र भारताचा युवा स्टार गिलने त्याच्या डोक्याच्या वरुन षटकार मारला. तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना इंग्लंडकडून ३४ वे षटक टाकण्यासाठी जेम्स अँडरसन गोलंदाजीला आला होता. (Cricket news in marathi)
या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर गिलने जेम्स अँडरसनच्या डोक्यावरुन धनुष्य बाणासारखाच सरळ षटकार मारला. अँडरसनने आतापर्यंत ६९८ गडी बाद केले आहेत. मात्र इतका सरळ आणि परफेक्ट टाईमिंग असलेला क्वचितच कुठल्या फलंदाजाने मारला असावा. गिलच्या या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Shubman Gill Six Video)
गिलने मारलेला हा परफेक्ट शॉट पाहून स्वत: बेन स्टोक्सही आश्चर्यचकीत झाला. गिलने १३७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र १०३ धावा करताच तो बाद होऊन माघारी परतला. मुख्य बाब म्हणजे त्याला जेम्स अँडरसननेच क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं.
रोहितसोबत महत्वपूर्ण भागीदारी
या डावात २१८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर आली होती. या दोघांनी चांगली सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या.
त्यानंतर यशस्वी जयस्वाल ५७ धावा करत माघारी परतला. त्यानंतर गिल आणि रोहितने संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी केली. रोहितने १०३ आणि गिलने ११० धावांची खेळी केली. यादरम्यान दोघांमध्ये १०४ धावांची भागीदारी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.