Shubman Gill Record in ipl 2024 becomes the second fastest to score 3000 runs in ipl twitter
क्रीडा

Shubman Gill Record: आयपीएलमध्ये गिलचा भीमपराक्रम! असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Shubman Gill 3000 Runs In IPL: या सामन्यात ७२ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill Record News:

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर अटीतटीची लढत पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. शेवटी २ धावांची गरज असताना गुजरातने हा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यात ७२ धावांची खेळी करणाऱ्या कर्णधार शुभमन गिलच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी १९७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिलने तेज तर्रार सुरुवात करून दिली. त्याने ४४ चेंडूत ७२ धावा चोपल्या.

दरम्यान या खेळीसह त्याने आयपीएल स्पर्धेत ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. राजस्थानविरुद्ध २७ धावा करताच त्याच्या नावे या रेकॉर्डची नोंद झाली आहे. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड केएल राहुलच्या नावे होता. केएल राहुलने हा रेकॉर्ड ८० व्या डावात आपल्या नावावर केला होता.

आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद ३००० धावा करण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर आणि शुभमन गिल हे संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानी आहेत. तर सर्वात जलद ३००० धावा करण्याचा रेकॉर्ड हा वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने हा रेकॉर्ड अवघ्या ७५ व्या इनिंगमध्ये केला होता. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या केएल राहुल ने हा रेकॉर्ड ८० व्या डावात आपल्या नावावर केला होता. (Cricket news in marathi)

हे आहेत आयपीएल स्पर्धेत सर्वात जलद ३००० धावा करणारे फलंदाज...

ख्रिस गेल - ७५

केएल राहुल - ८०

डेव्हिड वॉर्नर - ९४

शुभमन गिल -९४*

सुरेश रैना - १०३

एबी डिव्हिलियर्स - १०४

अजिंक्य रहाणे - १०४

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT