shubman gill with cheteshwar pujara saam tv
Sports

Shubman Gill: स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला! गिलचा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय फसला; आता पुढे काय?

IND vs WI 2nd Test: भारत- वेस्टइंडीज कसोटी मालिकेपूर्वी त्याने सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 2nd Test Shubman Gill Number 3 Spot: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज संघाविरुद्ध दोन हात करताना करतोय. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादमध्ये सुरू आहे.

या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघ मजबुत स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ४ गडी बाद २८८ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी नाबाद ८७ धावांवर माघारी परतलेला विराट कोहली आपले ७६ वे शतक झळकावण्यापासून केवळ १३ धावा दुर आहे.

शुबमन गिल ठरतोय फ्लॉप..

भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज शुबमन गिल गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करतोय. मात्र भारत- वेस्टइंडीज कसोटी मालिकेपूर्वी त्याने सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरल्याचे दिसून आले आहे.

कारण आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. पहिल्या कसोटीत त्याला अवघ्या ६ धावा करता आल्या होत्या. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अवघ्या १० धावा करत माघारी परतला आहे.

यापूर्वी तो केवळ एकदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ४७ धावांची खेळी केली होती. तर डावाची सुरूवात करताना त्याने आतापर्यंत त्याने २ शतक आणि ४ अर्धशतके झळकावले आहेत. (Latest sports updates)

द्रविडसोबत चर्चा करून घेतला निर्णय..

ही मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने म्हटले होते की, 'शुबमन गिल आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. त्याने द्रविडसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये याच क्रमांकावर फलंदाजी करतो.'

त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालला डावाची सुरूवात करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा पूरेपूर फायदा घेत त्याने पहिल्या डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आहे. तर दुसरीकडे शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर हवी तशी कामगिरी करता आली नाही.

त्याला याच क्रमांकावर खेळण्याची आणखी एक संधी मिळू शकते. जर या डावातही तो फ्लॉप ठरला तर टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे-अमित शहांची भेट, राऊतांच्या पोटात का दुखतंय?; सामंत भडकले | VIDEO

Train Travel Hacks: लोकल प्रवासात उलटी होत असेल तर लिंबू ठेवा जवळ; मिळेल त्वरित आराम

Heart attack in bathroom: बऱ्याच जणांना बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो? यामागे काय कारणं आहे, जाणून घ्या

Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, VIDEO

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

SCROLL FOR NEXT